मुंबई- BIOPIC ON IPS KIRAN BEDI : ड्रीम स्लेट पिक्चर्सने बहुप्रतिक्षित बायोपिक फीचर फिल्म 'बेदी: द नेम यू नो... द स्टोरी यू डोन्ट'ची अधिकृत घोषणा केली आहे. भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरस्कार विजेते दिग्दर्शक कुशल चावला करणार आहेत. या बायोपिकमध्ये किरण बेदींची कारकीर्द आणि त्यांचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे.
ही कथा आहे एका भारतीय महिलेची - किरण बेदीची
चित्रपटाच्या घोषणेदरम्यान एका निवेदनात डॉ. किरण बेदी म्हणाल्या, "ही कथा केवळ माझी कथा नाही. ही कथा आहे एका भारतीय स्त्रीची - एक भारतीय स्त्री जी भारतात वाढली, भारतात शिकली, भारतीय पालकांनी संगोपन केलं आणि तिच्या संपूर्ण कारकिर्दीत भारतातील लोकांसाठी काम केलं. माझी कहाणी वयाच्या नऊव्या वर्षी सुरू झाली जेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितलं, 'जीवन उतारावर आहे, तू एकतर वर जा किंवा तू खाली ये,' आणि माझी आई म्हणाली, 'तुम्ही नेहमी दुसऱ्यांकडून घेणारं नसावं.' त्यांच्या या शब्दांनी मला नेहमीच प्रेरणा दिली."
कधी रिलीज होणार?
चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी बोलताना किरण बेदी म्हणाल्या, "आमचा उद्देश हा चित्रपट ५० व्या आंतरराष्ट्रीय महिला वर्षात प्रदर्शित करण्याचा आहे. ही एका भारतीय महिलेची कथा असेल जी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या महान देशाचे प्रतिनिधित्व करेल." आपले कार्य पूजन मानणाऱ्या सर्व पिढ्यांसाठी हा चित्रपट असल्याचे प्रतिपादन डॉ.बेदी यांनी केले.
प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणादायी कथा : कुशल चावला
या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक कुशल चावला म्हणाले, "या फीचर फिल्ममध्ये डॉ. बेदी यांचा संघर्ष आणि या पुरुषप्रधान समाजातील पहिली महिला म्हणून त्यांनी स्वत:साठी यशाचा मार्ग कसा निर्माण केला हे दाखवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. प्रेक्षकांनी खाकी वर्दीमागील स्त्रीला अधिक चांगल्या प्रकारे ओळखलं पाहिजे, असे माझे मत आहे. बेदी हे तुम्हाला माहीत असलेले नाव आहे,पण, ही एक एक प्रेरणादायी कथा असल्याचा दावा तुम्ही करत नाही. अनेक अडथळ्यांवर मात करून खडतर मार्ग सुकर करणाऱ्या डॉ. किरण बेदी या खऱ्याखुऱ्या स्त्रीला यात दाखवलं जाईल."
हेही वाचा -
- आमिरचा मुलगा जुनैद खानच्या चित्रपटाला हिंदू संघटनांचा विरोध, ट्रेलर-प्रमोशनशिवाय 'महाराज' होणार थेट रिलीज - Maharaj release
- पवन कल्याणनं घेतली आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, चिरंजीवीचा घेतला आशीर्वाद - Pawan Kalyan took oath
- गोळीबार प्रकरणी सलमान आणि अरबाज खानचे पोलिसांनी नोंदवले जबाब - Salman Khans statement