डरबन Playing 11 Announced : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मायदेशात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे, त्यातील पहिला सामना आज 27 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. आता या सामन्यासाठी आफ्रिकन संघानं प्लेइंग इलेव्हनची 15 तासाआधीच घोषणा केली आहे. नियमित कर्णधार टेंबा बावुमाचं पुनरागमन झालं आहे. दुखापतीमुळं तो बराच काळ संघाबाहेर होता. आयर्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात तो जखमी झाला होता. ऑगस्ट 2024 मध्ये त्यानं आफ्रिकन संघासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
🟢🟡Match Day
— Proteas Men (@ProteasMenCSA) November 27, 2024
The 1st Test Match gets underway today between South Africa & Sri Lanka!🇿🇦vs🇱🇰
Both nations will battle it out as they gun for a spot in the final of the WTC next year.🏏#WozaNawe #BePartOfIt #SAvSL pic.twitter.com/btb7ILt1vk
केशव महाराजला संघात स्थान : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी तीन वेगवान गोलंदाजांना स्थान देण्यात आलं आहे. यात जेराल्ड कोएत्झी, मार्को यान्सन आणि कागिसो रबाडा यांचा समावेश आहे. याशिवाय अष्टपैलू खेळाडू विआन मुल्डरला संधी देण्यात आली आहे. केशव महाराजकडे फिरकी विभागाची जबाबदारी आली आहे. केशवनं याआधीही अनेक सामन्यांमध्ये स्वबळावर संघाला विजय मिळवून दिला आहे. आफ्रिकन संघासाठी त्यानं आतापर्यंत 184 बळी घेतले आहेत.
Putting In The Work!😮💨
— Proteas Men (@ProteasMenCSA) November 26, 2024
Our Proteas are ready for the Sri Lanka challenge. 💪
Catch all the action LIVE as we battle it out in the first of 2 Test Matches this Wednesday!🏏🇿🇦
Get your tickets on: https://t.co/Fp6Np07IRk#WozaNawe #BePartOfIt #SAvSL pic.twitter.com/XhqpLkhUWJ
फलंदाजी आक्रमण मजबूत : दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी आक्रमणात एडन मॅक्रम, टोनी डीजॉर्ज, ट्रिस्टन स्टब्स आणि टेंबा बावुमा यांसारख्या फलंदाजांचा समावेश आहे. स्टब्स गेल्या काही काळापासून दक्षिण आफ्रिकेसाठी चांगली कामगिरी करत आहे आणि आवश्यकतेनुसार त्यानं महत्त्वपूर्ण धावा केल्या आहेत. त्याच वेळी, मकरम आणि टोनी डी जॉर्जी हे देखील लांब डाव खेळण्यात माहिर आहेत.
आफ्रिकन संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. सध्या ते WTC 2023-25 च्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. या संघानं 8 सामने खेळले आहेत, त्यापैकी चार जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. त्याची PCT 54.17 आहे. श्रीलंका मालिकेनंतर आफ्रिकेला मायदेशात पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
South Africa have named a strong XI for the first Test against Sri Lanka as they aim for a place in the #WTC25 final 👏
— ICC (@ICC) November 26, 2024
More ➡ https://t.co/THUQ0dvqpv#SAvSL pic.twitter.com/DwFLAvl2FS
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी आफ्रिकेची प्लेइंग 11 :
टोनी डी जोर्गी, एडन मॅक्रम, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (यष्टिरक्षक), वियान मुल्डर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा.
हेही वाचा :