Home Remedies For Pigmentation: आपण इतरांपेक्षा जास्त सुंदर दिसावं अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. परंतु प्रदूषण, वाढते वय, मानसिक आणि शारीरिक समस्या, तसंच केमिकलयुक्त उत्पादनाच्या नियमित वापरामुळे त्वचे संबंधित एका न अनेक समस्यांचा सामना मुलींना तसंच महिलांना करवा लागतो. केमिकलयुक्त प्रोडक्ट्स वापरल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे बऱ्याचदा चेहऱ्यावर पुरळ येतात. परिणामी पुरळ गेल्यानंतर चेहऱ्यावर काळे डाग दिसू लागतात. यालाच पिग्मेंटेशन किंवा वांग असंही म्हटलं जातं. बऱ्याचदा महिलांनी तिशी ओलांडल्यावर चेहऱ्यावर पिगमेंटेशन म्हणजेच वांगाचे डाग दिसू लागतात. पिग्मेंटेशन वाढू लागलं की त्वचा काळी आणि खराब दिसू लागते.
- पिगमेंटेशनची कारण: चेहऱ्यावरील पिग्मेंटेशनमुळे कॉन्फिडनस लेव्हल कमी होतो. फोड, मुरुम, तसंच इतर दुखापती, सुर्यप्रकाश, अनुवांशिकता, ऑटोइम्युन अशा अनेक गोष्टी पिग्मेंटेशनसाठी कारणीभूत ठरू शकतात. याला बदलती जीवनशैली देखील जबाबदार आहे. त्याचबरोबर शरीरामध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, मिनरल्स तसंच इतर पोषक घटकांची कमतरता झाल्यास देखील पिंगमेंटेशन वाढू लागते. चेहऱ्यावरील नको असलेले पिंग्मेंटेशनचे डाग घालवण्यासाठी महिला विविध उपाय करतात. मात्र, कितीही उपाय केले तरी ही गंभीर समस्या सोडवण्यात त्या अपयशी ठरतात. परंतु काही घरगुती उपाय केल्यास पिंग्मेंटेशन पासून मुक्ती मिळू शकते.
- बटाट्याचा रस: बटाट्याचा रस त्वचा उजळवण्यासाठी उपयुक्त आहे. त्वचेवरील काळे डाग घालवण्यासाठी अनेजण बटाट्याचा वापर करतात. बटाट्यातील ब्लीचिंग गुणधर्म डाग कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तसंच यातील अँटिऑक्सिडंट्स डोळ्याखाली येणारे डार्क सर्कल कमी करण्यासाठी देखील मदत करते. बटाटा लावण्यापूर्वी त्याचा चांगला किस करून घ्या आणि त्यातील रस बाजूल काढा. हा रस संपूर्ण चेहऱ्यावर 15 मिनिट लावून ठेवा. यामुळे त्वचा थंड राहिल. आता स्वच्छ पाण्यानी चेहरा धुवा. हा उपाय नियमित केल्यास तुम्हाला पिंगमेंटेशनच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. तसंच यामुळे तुमचा चेहरा सुंदर आणि चमकदार दिसू लागेल.
- मुलतानी माती आणि मसूर डाळ फेसपॅक: पिंगमेंटेशन कमी करण्यासाठी तुम्ही मुलतानी माती तसंच मसूर डाळीपासून तयार केलेला फेसपॅक लावू शकता. यामुळे नैसर्गिक ग्लो टिकून राहतो. त्याचबरोबर त्वचा चमकदार दिसू लागते. सर्वात आधी एक वाटीमध्ये मुलतानी माती आणि एक चमचा मसूर डाळीचं पावडर मिक्स करा. त्यात थोडं तांदुळाचं पीठ घाला आणि पाण्यानं किंवा रोस वाटर घालू त्याची पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटं तसंच ठेवा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोन दिवस केल्यास तुम्हाला चांगला फायदा होईल.
- तुळशीच्या पानांचा रस: पिंगमेंटेशन कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस फायदेशीर आहे. सर्वात आधी तुम्ही तुळशीचे पान बारीक वाटून घ्या. आता तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटं तसंच ठेवा. 15 मिनिटानंतर चेहऱ्या थंड पाण्यानी स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय तुम्ही नियमित केल्यास चांगला फायदा होईल.
- लिंबाचा रस: लिंबामध्ये असलेले गुणधर्म बॅक्टेरीया मारून टाकण्यास मदत करतात. एक वाटी घ्या त्यात लिंबाचा रस घाला. लिंबाचा रस थेट वापरू नका त्यात बदामाचं तेल मिक्स करा. तयार झालेले मिश्रण आता चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटं तसंच ठेवा. 15 मिनिटानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवा.
संदर्भ
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/26471635/
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC7723200/