महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये 'या' स्पर्धकांनी केली एंट्री, देवोलीना भट्टाचार्यनं 'हा' घेतला आक्षेप - bigg boss ott season 3 - BIGG BOSS OTT SEASON 3

Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. यावेळी शोमध्ये प्रेक्षकांचं खूप मनोरंजन होणार आहे. देवोलीना भट्टाचार्यनं शोमध्ये सहभागी झालेल्या अरमान मलिकवरून प्रश्न उपस्थित करत सोशल मीडियावर पोस्ट केली.

Bigg Boss OTT 3
बिग बॉस ओटीटी 3 ('बिग बॉस' ओटीटी 3 (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 11:02 AM IST

मुंबई - Bigg Boss OTT 3 :'बिग बॉस ओटीटी 3'चा जिओ सिनेमावर भव्य प्रीमियर सुरू झाला. या शोचा होस्ट अनिल कपूर असून आता 'बिग बॉस ओटीटी 3'मधील स्पर्धकांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'नागिन' फेम पौलोमी दासनं एका कॉन्ट्रॅक्टसह शोमध्ये प्रवेश केला असून आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. तिनं मांसाहाराला परवानगी देण्यापासून बंगाली असल्यानं महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यापर्यंत सर्व गोष्टींची मागणी केली. याशिवाय तिनं घरात आठ तास झोपण्याची मागणी केली आहे. तसेच या शोमध्ये रॅपर नेझीनं एंट्री केली आहे.

बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झालेल्या युट्युबर अरमान मलिकला दोन पत्नी आहेत. त्यावरून अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यनं व्हिडिओ पोस्ट करत टीका केली. तिनं सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, " हे मनोरंजन नसून घाण आहे. या निर्लज्जपणाला करमणूक कशी म्हणता येईल? बहुपत्नीत्व मनोरंजक वाटते का? जेव्हा तुम्ही अशा स्पर्धकांची ओळख करून दिली तेव्हा काय विचार केला होता? हा शो लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण पाहताना नवीन पिढीला काय शिकवायचे आहे? विशेष विवाह कायदा आणि यूसीसी (युनिफॉर्म सिव्हिल कोड) अनिवार्य असावे."

'बिग बॉस ओटीटी 3'मधील स्पर्धकाची लिस्ट : 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये भारतीय बॉक्सर नीरज गोयतनं प्रवेश केला असून आता सोशल मीडियावर त्याच्याबद्दल चर्चा होताना दिसत आहेत. यूट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या पत्नी पायल आणि कृतिकासह 'बिग बॉस ओटीटी 3'चा भाग झाले आहेत. शो दरम्यान, अरमानला दोनदा लग्न कसे झाले, असा प्रश्न अनिल कपूरनं केला. यावर तिघांनीही कठीण परिस्थितीत लग्न केल्याचं यावेळी सांगितलं. तसेच तिघेही खूप चांगले मित्र असल्याचं यावेळी दिसलं. पायल आणि कृतिकानं एकमेकांचे टॅटू देखील गोंदवले आहे. पायलनं यावेळी सांगितलं की, अरमानची सर्व सेविंग्स त्याच्या पत्नीच्या नावावर आहे.

स्पर्धकांची एंट्री : सना सुलताननेही या शोमध्ये प्रवेश केला आहे. अनिल कपूरच्या सांगण्यावरून सनानं एक कविता ऐकवली. टॅरो कार्ड रीडर मुनिषा खटवानीदेखील प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या शोमध्ये तिची एंट्री झाली आहे. यावेळी अनिल कपूरनं खुलासा केला होता की, तिनं सोनम कपूरसाठीदेखील टॅरो कार्ड वाचन केलं होतं. तसेच अभिनेता शोमध्ये साई केतन रावनं प्रवेश केला आहे. यावेळी त्यानं आपल्या संघर्षाची आठवण केली. पाचवा स्पर्धक विशाल पांडे आहे. विशाल हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. याशिवाय लव कटारियानं सहावा स्पर्धक म्हणून प्रवेश केला आहे. पत्रकार दीपक चौरसिया यांच्यासाठी तात्पुक 'ब्रेकिंग न्यूज' व्यासपीठ तयार करण्यात आलं आहे. दीपक चौरसिया हे शोचा सातवा स्पर्धक आहे.

हेही वाचा :

  1. सलमान खान गोळीबार प्रकरण; फॉरेन्सिक अहवालात 'ही' धक्कादायक माहिती आली समोर - Salman Khan Firing Case
  2. आमिर खानचा मुलगा जुनैदनं 'महाराज' चित्रपटातून केलं पदार्पण, बहीण इरा आणि मेव्हणा नुपूरची प्रतिक्रिया - Maharaj release
  3. महाराज X रिव्ह्यू : जुनैद खाननं पदार्पणातच जिंकली प्रेक्षकांची मनं, जयदीप अहलावतच्या कामावर नेटिझन्स फिदा - Maharaj X Review

ABOUT THE AUTHOR

...view details