मुंबई - Bigg Boss OTT Season 3 :'बिग बॉस ओटीटी'च्या नवीन सीझन 3ची वाट अनेकजण पाहात आहेत. अखेर 'बिग बॉस ओटीटी 3' संदर्भात एक अपडेट समोर आली आहे. या शोचा पहिला प्रोमो आता सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. हा प्रोमो अनेकांना आवडत असून यावर अनेकजण प्रतिक्रिया देऊन सलमान खानबद्दल विचारत आहेत. कारण तिसऱ्या सीझनमध्ये 'भाईजान' चाहत्यांना दिसणार नाही. याऐवजी अनिल कपूर हा शो होस्ट करताना दिसेल, असं सध्या म्हटलं जात आहे. 'बिग बॉस ओटीटी' शो 2021 मध्ये पहिल्यांदाच सुरू झाला. पहिल्या सीझनची विजेती दिव्या अग्रवाल होती. यानंतर यूट्यूबर एल्विश यादवनं रिॲलिटी शोचा दुसरा सीझन जिंकला.
'बिग बॉस ओटीटी 3'चा प्रोमो रिलीज : पहिल्या सीझनमध्ये करण जोहरनं शो होस्ट केला होता. दुसरा सीझन हा सलमान खाननं होस्ट केला होता. 'बिग बॉस ओटीटी 3' जूनमध्ये जीओ सिनेमावर लॉन्च होईल. यानंतर 22 जूनला 'बिग बॉस ओटीटी 3' च्या आगामी सीझनची घोषणा केली जाणार आहे. प्रोमोमध्ये 'बिग बॉस'मधील शेवटच्या सीझनच्या काही खास क्षणांची झलक शेअर दाखविल्या आहेत. याशिवाय एक घोषणाही करण्यात आली आहे. या प्रोमोत असं म्हटलं गेलं आहे की, "बिग बॉस ओटीटी'चा नवा सीझन पाहिल्यानंतर तुम्ही सर्व काही विसरून जाल." दरम्यान 'बिग बॉस ओटीटी 3'च्या स्पर्धकांबाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाही.