महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5' मध्ये कोणते सेलिब्रिटी स्पर्धक असणार? ग्रँड प्रिमिअरनंतर आजपासून सुरू होणार शो - bigg boss marathi season 5 - BIGG BOSS MARATHI SEASON 5

Bigg Boss Marathi 5: रितेश देशमुखचा शो 'बिग बॉस मराठी सीझन 5' आजपासून सुरू होणार आहे. या शोमध्ये कोणते स्पर्धक असणार याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 28, 2024, 12:18 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5:अभिनेता रितेश देशमुख सध्या 'बिग बॉस मराठी सीझन 5'मुळे सध्या चर्चेत आहे. आता या शोमुळे देशभरातील चाहत्यांमध्ये एक उत्सुकता निर्माण केली आहे. या सीझनमध्ये नवीन ट्विस्ट पाहायला प्रेक्षकांना मिळणार आहेत. यावेळी शोचं होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. हा एक मोठा बदल या शोमध्ये होतं आहे.

'बिग बॉस मराठी सीझन 5' शोचा एक टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझर अनेकांना आवडत आहे. या टीझरमध्ये रितेश देशमुख डान्स करताना दिसत आहे. मागील चार सीझनच्या अफाट यशानंतर चाहते मोठ्या आतुरतेनं 'बिग बॉस मराठी 5'ची वाट पाहत होते. बिग बॉसचा नवीन सीझन हा आता अवघ्या काही तासांमध्ये सुरू होईल. 28 जुलै रोजी या शोमध्ये एक भव्यता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठी कुठे पाहू शकता ?: बिग बॉस मराठी हा शो कलर्स मराठीवर रात्री 9 वाजता आणि जीओ सिनेमावर प्रसारित होणार आहे. यापूर्वी हा शो महेश मांजरेकर यांनी होस्ट केला होता. चार यशस्वी सीझननंतर, आता या कार्यक्रमाला आणखी उंचीवर नेण्यासाठी रितेश देशमुख सज्ज आहे. केदार शिंदे दिग्दर्शित, या नवीन सीझनमध्ये चाहत्यांसाठी एक आकर्षक अनुभव आणि रोमांचकारी राईडचा अनुभव मिळेल. भव्य बिग बॉसच्या घराची काळजीपूर्वक रचना केली आहे. नुकताच इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये बिग बॉसचं घर दाखवले जात आहे. आता बिग बॉसचं घर हे अनेकांना आवडत आहे. अनेकजण हा प्रोमो पाहून बिग बॉसच्या घराचं कौतुक केलंय. यापूर्वी एका परदेशी गर्लचादेखील प्रोमो शेअर करण्यात आला होता. आता ही परदेशी गर्ल कोण असणार याची देखील उत्सुकता अनेकांना लागली आहे.

बिग बॉस मराठी 5मध्ये 'हे' स्पर्धक असू शकतात.

  • विवेक सांगळे
  • अभिजीत सावंत
  • अंकिता वालावलकर
  • अरबाज पटेल
  • वर्षा उसगावकर
  • चेतन वडनेरे
  • शुभंकर तावडे
  • समीक्षा टक्के
  • प्रणव रावराणे
  • पंढरीनाथ कांबळे
  • अमृता खानविलकर

हेही वाचा :

  1. रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी' सीझन 5 करणार होस्ट, प्रोमो झाला रिलीज - Riteish Deshmukh

ABOUT THE AUTHOR

...view details