मुंबई - Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी सीझन 5' हे प्रेक्षकांंचं खूप मनोरंजन करत आहे. या शो मध्ये रोज वेगवेगळ्या कारणांमुळे भांडणं होत आहेत. आज, 6 ऑगस्ट रोजी 'बिग बॉस'मध्ये 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' टास्क पार पडणार आहे. आता या टाक्समध्ये कोण बाजी मारेल, हे काही वेळात समजेल. तसंच पाचव्या सीझनचा पहिला कॅप्टन होणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. कॅप्टनसीच्या टास्कमध्ये अनेकदा भांडणं पाहायला मिळतं. 'बिग बॉस'च्या घरात दोन गट पडले आहेत. एका गटात वैभव चव्हाण, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक आहेत.
'बिग बॉस मराठी 5'चा प्रोमो रिलीज :तसेच दुसऱ्या गटात अभिजीत सावंत, अंकिता प्रभू वालावलकर, आर्या जाधव, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, वर्षा उसगावकर, पंढरीनाथ कांबळे हे स्पर्धक तगडी टक्कर देताना दिसतील. 'बिग बॉस'च्या घरात 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' टास्क आज खेळला जाईल. आता 'बिग बॉस'च्या निर्मात्यांनी एक प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोत टास्कदरम्यान अभिजीत सावंत आणि अरबाज पटेलमध्ये जोरदार भांडण होताना दिसत आहे. यानंतर अरबाज हा घरातील सर्व सदस्यांवर राग काढतो. टास्कमध्ये अरबाज म्हणतो, "तुम्ही सगळे बघा, मी कुणालाच ट्रेनच्या आत बसू देणार नाही." ही धमकी देत तो घरातील सर्व सदस्यांवर ओरडतो. यानंतर दुसरीकडे अंकिता टास्कदरम्यान 'बिग बॉस' प्लीज मला हर्ट होतंय." असं म्हणते.