महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अरबाज पटेल-संग्राम चौगुलेमध्ये होणार राडा, कॅप्टन्सी टास्कचा प्रोमो व्हायरल - bigg boss marathi - BIGG BOSS MARATHI

Bigg boss Marathi 5 : बिग बॉस निर्मात्यांनी एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये अरबाज पटेल आणि संग्राम चौगुलेमध्ये जोरदार संघर्ष होताना दिसत आहे.

Bigg boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (Instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2024, 1:56 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' या शोमधील नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरामधील सर्व सदस्य टास्कमध्ये 100 टक्के योगदान दिसत आहेत. 'बिग बॉस मराठी 5' सीझन सुरू होऊन 50 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. आता घरामध्ये कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी टास्क सुरू झाला आहे.

टास्कमध्ये कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी दुसऱ्या सदस्यांच्या घरट्यात अंड ठेऊन घरात नको असलेल्या सदस्याला बाद करायचं होतं. यानंतर निक्की ही संग्राम आणि अभिजीतला कॅप्टन्सीमधून बाद करत नाही. त्याऐवजी ते कोकण गर्ल अंकिता वालावलकर आणि पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे यांना कॅप्टन्सीमधून बाद करतात. कालचा एपिसोड हा खूप धमाकेदार होता.

कॅप्टन्सी टास्क :आता निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या प्रोमोत घरातील सदस्यामध्ये राडा होताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोत खेचाखेची पाहायला मिळत आहे. प्रोमोत पॅडी आणि जान्हवी किल्लेकर हे प्लॉन बनवताना दिसत आहेत. यानंतर धनंजय पोवार हा म्हणतो, "या गटातून आम्हाला पॅडी पाहिजे." यानंतर पुढं अरबाज पटेल, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, संग्राम चौगुले आणि सूरज चव्हाण टास्क जिंकण्यासाठी जीवतोड मेहनत करताना दिसत आहेत. याशिवाय घरातील बाकी सदस्य बाल्कनीतून आरडाओरडा करत आहेत. टास्क दरम्यान घरातील सदस्यामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे.

अरबाज पटेल आणि संग्राम चौगुलेमध्ये संघर्ष : शेवटी प्रोमोत संग्राम अंड पळवण्यासाठी पुढे जातो, तेव्हा अरबाज हा त्याचा शर्ट खेचतो. यावेळी अरबाज त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न करतो. यावर संग्राम हा आपला पूर्ण जोर लावतो. अरबाजची पकड ढिली झाल्यानंतर तो "ओह शिट" म्हणतो. यावेळी अरबाज हा वर्षा ऊसगावकर यांना अंड घेण्यासाठी सांगतो. आता या टास्कमध्ये पुढं काय होणार? हे आजच्या एपिसोडमध्ये समजेल. आता प्रोमोच्या पोस्टमध्ये अनेकजण अरबाज हा चांगला खेळत असल्याचं म्हणत आहेत. टीम एमध्ये अरबाज, निक्की, वर्षाताई, सूरज आणि धनंजय आहेत. याशिवाय टीम बीमध्ये जान्हवी, अंकिता, संग्राम, अभिजीत आणि पॅडी आहेत. आता दोन्ही टीममध्ये कोण बाजी मारेल? हे आजच्या एपिसोडमध्ये समजेल.

हेही वाचा :

  1. बीबी करन्सी मिळविण्यात अरबाज पटेल आणि जान्हवी किल्लेकर झाले अयशस्वी, प्रोमो व्हायरल - Bigg Boss Marathi
  2. अभिजीत सावंत आणि पंढरीनाथ कांबळेमध्ये रंगली चर्चा, अरबाज पटेलला आहे धोका ? - Bigg Boss Marathi
  3. आर्या जाधवनंतर वैभव चव्हाणला शोमधून 'बिग बॉस'नं दाखवला बाहेरचा रस्ता, नवीन प्रोमो रिलीज - Bigg Boss Marathi

ABOUT THE AUTHOR

...view details