महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

श्रृतिका ठरली बिग बॉसच्या घरात लाडली, मुस्कानवर बाहेर होण्याची टांगती तलवार - SHRUTI AND SPECIAL POWER

'बिग बॉस'च्या प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये श्रृतिकाला एक विशेष अधिकार देण्यात आला आहे. याशिवाय आजच्या एपिसोडमध्ये चाहत आणि अविनाशमध्ये भांडणं पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss 18
बिग बॉस 18 (बिग बॉस 18 (@colorstv Instagram))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 23, 2024, 10:58 AM IST

Updated : Oct 23, 2024, 11:32 AM IST

मुंबई - 'बिग बॉस १८' चा लेटेस्ट एपिसोड शोची दिशा ठरवणारा ठरला. सकाळी उठल्यापासूनच स्पर्धकांमध्ये दिवसभरासाठीची रणनिती ठरत होती. पण अचानक बिग बॉसनं श्रृतिकाला एक विशेष अधिकार देऊन ट्विस्ट निर्माण केला. गेल्या काही दिवसापासून बिग बॉसचा लाडका किंवा लाडकी, कलर्सची लाडकी वगैरे चर्चा रंगल्या होत्या. मग सर्व स्पर्धकांनाच हा प्रश्न विचारण्यात आला आणि सर्वांनी बहुमतानं श्रृतिकाचं नाव घेतलं. त्यानुसार तिला सिंहासनावर बसवण्यात आलं आणि स्पर्धकांच्या नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यात श्रृतिका अधिकार देण्यात आला की, कोणता स्पर्धक किती लोकांना नॉमिनेट करु शकेल.

श्रृतिका मिळाली स्पेशल पॉवर :यामध्ये श्रृतिकानं कोणाला एक, तर कोणाला दोन आणि कोणाला तीन लोकांना नॉमिनेट करण्याचा अधिकार स्पर्धकांना दिला. शिल्पा शिरोडकर हिला ३ लोकांना नॉमिनेट करण्याचा अधिकार मिळाला. यावेळी तिनं चाहत, अविनाश आणि नायराचं नाव घेतलं. त्यानंतर अविनाशला मात्र एकही व्यक्तीला नॉमिनेशन करण्याचा अधिकार मिळाला नाही. यामुळं तो भडकला. त्यानं वाद घालण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याची आणि शहजादाचीही फाईट झाली.

'बिग बॉस'च्या घरात नॉमिनेशन :सध्या बिग बॉसमध्ये कोणीच टाईम गॉड नाही. त्यामुळं नॉमिनेशनपासून कोणीच वाचू शकणारं नाही. यापूर्वी गुणरत्न सदावर्ते कामाच्या निमित्तानं 'बिग बॉस'मधून बाहेर आहे तर हेमा शर्माचं नुकतंच घरा बाहेर झाली आहे, त्यामुळे पुढील स्पर्धक कोण 'बिग बॉस'मधून बाहेर पडणार याची उत्कंठा लागून राहिली आहे. या स्पर्धेतून मुस्कान बामणे बाद होण्याची सर्वाधिक शक्यता निर्माण झाली आहे. अविनाश मिश्राचंही नाव नॉमिनेशनसाठी पक्कं झालं आहे. बिग बॉस हाऊसमधलं वातावरण हळूहळू तापत चाललंय. स्पर्धा रंगतदार होत असून येत्याकाळात अनेक रंगतदार ट्विस्ट पाहायला मिळतील आशा प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत. याशिवाय घरामध्ये अविनाश आणि चाहतमध्ये यांच्यामध्ये आजच्या एपिसोडमध्ये भांडणं पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस' निर्मात्यांनी एक प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये चाहते ही जेलमध्ये झोपून असलेल्या अविनाशवर पाणी फेकते, यानंतर त्याच्यात वाद होताना दिसते. सध्या अविनाश हा 'बिग बॉस'च्या शोमध्ये खूप चर्चेत आहे.

हेही वाचा :

  1. आश्वासनांचा पाऊस पडूनही निवडणुकीचा धक्कादायक निकाल, सत्तेपासून 'दलाल' वंचित !
  2. चाहत पांडेला कसा पाहिजे पती ?, सलमान खानसमोर 'या' व्यक्तीचं नाव घेऊन व्यक्त केल्या भावना
  3. अविनाश मिश्राला मिळाली राशनची जबाबदारी, 'बिग बॉस'च्या घरात सावळा गोंधळ
Last Updated : Oct 23, 2024, 11:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details