मुंबई -'बिग बॉस 18'मध्ये प्रत्येक दिवस स्पर्धकांसाठी खूप कठिण असल्याचं सध्या दिसत आहे. करणवीर मेहरा,अविनाश मिश्रा, चाहत पांडे, रजत दलाल आणि विवियन डिसेना यांच्यामध्ये घरात सतत भांडणं होताना दिसत आहेत. अलीकडेच 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खाननं अविनाश मिश्राचा क्लास घेतला होता. याशिवाय करणवीर मेहरालाही फटकारलं होतं, तर रजत दलालचं सलमान खाननं कौतुक केलं होत. अविनाशला सलमानच्या खरडपट्टीची पर्वा नसल्याचं आता दिसत आहे. बिग बॉस निर्मात्यांनी एक सोशल मीडियावर प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये अविनाश आणि रजतमध्ये पुन्हा एकदा भांडण होताना दिसत आहे.
अविनाश मिश्रा आणि रजत दलालमध्ये झाली भांडण :अविनाश हा रजतशिवाय चाहत पांडेबरोबर देखील भिडताना दिसणार आहे. रजत दलाल केवळ चाहत पांडेसाठी अविनाशशी टक्कर घेणार असल्याचं प्रोमोमध्ये दाखविण्यात आलं आहे. प्रोमोची सुरुवातीला चाहत म्हणते, "अविनाश, तू रात्री टेबल साफ केला नाहीस का? हे ऐकून अविनाश म्हणतो तुला का सांगू?" रजत दलाल या गोष्टीवर चिडतो आणि अविनाशला फटकारत म्हणतो, "घरातील कुठल्याही मुलीला कोणी दु:खी करणार नाही." यावर अविनाश म्हणतो," हे सर्व तू का करत आहे?" यानंतर रजत आणि अविनाशमध्ये हमरी-तुमरी होते. आता या प्रोमोच्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.