महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बिग बॉस 18'च्या घरातील पायजमा पार्टीत करणवीरनं चुमकडे केल्या भावना व्यक्त, व्हिडिओ व्हायरल - CHUM AND KARANVEER

'बिग बॉस 18'मध्ये श्रुतिका आणि चुम यांच्यात वाद झाले आहे. याशिवाय करणवीरनं चुमकडे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

bigg boss 18
बिग बॉस 18 (करणवीर-चुम दारंग (ANI))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 13, 2024, 12:48 PM IST

मुंबई : गेल्या मंगळवारी 'बिग बॉस 18'मध्ये बरेच काही पाहायला मिळाले. एकीकडे श्रुतिका अर्जुन राज आणि चुम दरंग यांच्यातील मैत्री तुटताना दिसत आहे, तर दुसरीकडे करणवीर मेहरानं चुमकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान शोचा पुढचा टाईम गॉड निवडण्यासाठी, बिग बॉसनं घरात पायजमा पार्टीचं टास्क ठेवलंय. या टास्कदरम्यान घरातील सदस्यांनी खूप मजा केली. आता सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये श्रुतिका आणि चुम यांच्यात भांडणे पाहायला मिळत आहेत.

करणवीरनं चुमकडे केल्या भावना व्यक्त : श्रुतिका आणि चुम यांची घरात खूप चांगली मैत्री आहे. श्रुतिका भाऊ आदित्य तर्फे चुमसमोर डेट ऑफर करते. चुम गमतीनं म्हणते की, ती एक महिना आदित्यला डेट करणार आहे. यादरम्यान, करणवीर चुमकडे त्याच्या भावना व्यक्त करतो. तो चुमला सांगतो की "मी कोणाला या शोमध्ये पसंत करणार नाही, या विचारानं आलो होतो, पण काल ​​आदित्यच्या मुद्द्यावरून मला हेवा वाटला. म्हणून वाटलं हे तुझ्याबरोबर शेअर करावं. मला वाटले की आपण प्रामाणिक असू शकतो, कारण आजकाल नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला आहे, हे तुला माहित आहे."

चुम आणि श्रुतिकाच्या मैत्रीत तडा : मस्ती आणि धमाल दरम्यान, श्रुतिका करणवीर आणि चुमला म्हणते की, "तुम्ही योग्य वेळी साथ देत नाहीत." करणवीर श्रुतिका शांतपणे तिचं ऐकूण घेतात. श्रुतिका शिल्पा शिरोडकरचे नाव घेते, त्यानंतर श्रुतिका आणि चुममध्ये भांडण होते. चुम श्रुतिकाबरोबरची मैत्री तोडले. मैत्री तुटल्यानंतर दोघेही खूप रडतात. दरम्यान टाइम गॉड निवडण्यासाठी बिग बॉसनं या आठवड्यासाठी पायजमा पार्टीचे टास्क देऊन घरातील सदस्यांना सुखद धक्का दिला होता. यानंतर बीबी हाऊसमध्ये मुली आणि मुलांचे वसतिगृह बांधले जाते.

रजत दलाल आणि शिल्पा शिरोडकर टास्क जिंकतात : या टास्कसाठी बिग बॉस घरातील सदस्यांना त्यांच्या इच्छेनुसार जोडीदार निवडण्यास सांगतात. करणवीर रोमँटिकपणे चुमला त्याचा जोडीदार होण्यासाठी प्रपोज करतो, यानंतर तिचा होकार असतो. तर, रजत दलालनं शिल्पा शिरोडकर, ॲलिसनं अविनाश, ईशानं विवियन आणि तजिंदर साराची निवड करतो. चाहत पांडे आणि कशिशला जोडीदार मिळत नाही. यामुळे बिग बॉस त्यांना वॉर्डन बनवतो आणि त्याच्या इच्छेनुसार जोडप्याला टास्कमधून बाहेर काढण्याचा अधिकार देतो. कुटुंबातील सदस्य या कार्यामध्ये खूप आनंद घेताना दिसतात. या टास्कमध्ये रजत दलाल आणि शिल्पा शिरोडकर विजयी होतात.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस 18'मध्ये विवियन डिसेना बनला पोस्टमन, आता देणार घरातील सदस्यांना धक्का
  2. विव्हियन त्याच्या माजी पत्नीचा छळ करत होता, सारा खानच्या दाव्यानं बिग बॉसमध्ये खळबळ
  3. विव्हियन डिसेनाला 8 स्पर्धक नॉमिनेट करण्याची शक्ती, दोन वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळं बिग बॉसमध्ये ट्विस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details