महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बिग बॉस 18'मध्ये विवियन डिसेना बनला पोस्टमन, आता देणार घरातील सदस्यांना धक्का - VIVIAN DSENA

'बिग बॉस 18'मधील एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये विवियन डिसेना हा पोस्टमनच्या रुपात दिसत आहे.

बिग बॉस 18
bigg boss 18 (Etv Bharat (Etv Bharat))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 11, 2024, 1:27 PM IST

मुंबई - अभिनेता सलमान खाननं होस्ट केलेला रिॲलिटी टीव्ही शो 'बिग बॉस 18'चा नवीन प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये विवियन डिसेना पुन्हा एकदा घरातील सदस्यांसमोर नवीन आव्हान सादर करताना दिसत आहे. आगामी एपिसोडमध्ये विवियन डिसेना पोस्टमनच्या भूमिकेत दिसेल आणि फोन लाइनवर कुटुंबातील सदस्यांना ऐकेल. प्रोमोत, विवियन डोक्यावर टोपी आणि खांद्यावर बॅग घेऊन खाकी गणवेशात सायकलवर येताना दिसत आहे. याशिवाय 'बिग बॉस' घरातील सदस्यांना सांगत आहेत की, आज घरातील सदस्यांना पत्रे येतील आणि त्यात एक वाईट बातमी नामांकनांची असेल.

विवियन डिसेनाला दिली बिग बॉसनं नवीन जबाबदारी : प्रोमोमध्ये पुढं पोस्टमॅन अवतारात असलेल्या विवियन डिसेनाबरोबर फोनवर रजत दलाल हा उद्धटपणे बोलतो, यानंतर तो आपली नाराजी व्यक्त करताना दिसतो. रजत हा स्वत:हा उद्धटपणे बोलून विवियनला शांतपणे बोलण्याचा सल्ला देतो. यानंतर प्रोमोमध्ये चाहत विवियनला विचारताना दिसते की, तो इतका चिडलेला का आहे. यावर तो म्हणतो, जे काही बोलायचं असेल, ते पटकन बोला. यानंतर घरातील प्रत्येक सदस्य हे फोनलाईनवर एकमेकांना नॉमिनेट करताना दिसतात. घरातील सदस्य विवियनला नॉमिनेट केल्याचे कारण देखील फोनवर सांगताना दिसतात.

विवियन डिसेना आणि करणवीर मेहरामध्ये वाद : प्रोमोत पुढं शिल्पा शिरोडकर आणि श्रुतिका अर्जुन एकमेकांवर आरोप करताना दिसते. याशिवाय सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे विवियननं करणवीर मेहराचं नॉमिनेशन नाकारलं आहे. तो करणवीरचं पत्र फाडून फेकताना व्हिडिओत दिसतो. विवियन डिसेनानं हे पत्र फाडून करणचे नामांकन स्वीकारले नसल्याचे प्रोमोत म्हटले. आता या मागचं कारण काय होते हे शो पाहून समजेल, आता याचा तोटा करणवीरला सहन करावा लागणार आहे असं सध्या प्रोमोवरून दिसून येत आहे. आणखी एक प्रोमो 'बिग बॉस' निर्मात्यांनी रिलीज केला आहे, यामध्ये विवियन हा कॉफीसाठी घरातील सदस्यांबरोबर भांडण करताना दिसत आहे. नुकताचं अफरीन खानला घरातून बाहेर काढण्यात आलं आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना भरपूर वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. याशिवाय 'बिग बॉस 18'मध्ये घरात सतत स्पर्धकांची संख्या वाढताना दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details