महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

चाहत पांडेला कसा पाहिजे पती ?, सलमान खानसमोर 'या' व्यक्तीचं नाव घेऊन व्यक्त केल्या भावना - BIGG BOSS 18

सोशल मीडियावर एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. यात चाहत पांडे तिला पती कसा पाहिजे, याबद्दल सांगताना दिसत आहे.

bigg boss 18
बिग बॉस 18 (Bigg Boss 18 (Photo: Instagram))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 20, 2024, 5:38 PM IST

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या प्रसिद्ध शो 'बिग बॉस 18'बाबत रोजचं नवीन अपडेट्स येत आहेत. या शोमध्ये स्पर्धकांचा आता खरा गेम सुरू झाला आहे. या आठवड्याचा वीकेंड वार खूपच रंजक असणार आहे. शनिवारच्या एपिसोडमध्ये सलमाननं रजत दलाल, अरफीन खानसह अनेक स्पर्धकांना धारेवर पकडलं आहे. तर दुसरीकडे अविनाश मिश्रा आणि शिल्पा शिरोडकर यांना 'भाईजान'नं पाठिंबा दिला. याव्यतिरिक्त चाहत पांडेबद्दल शोमध्ये एक रंजक गोष्ट माहित झाली आहे. बिग बॉसच्या घरातच पुन्हा एकदा प्रेमाची हवा पाहायला मिळत आहे. सलमाननं याबाबत खुलासा केला आहे. आता चाहतला घरातील कुठला सदस्य आवडतो, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चाहत पांडेला कसा पाहिजे पती ?: 'बिग बॉस' निर्मात्यांनी एक प्रोमो रिलीज केला आहे. यात सलमान खान म्हणतो, "चाहत, तू पाचव्यांदा सांगितलं की, तुला लग्न करायचे आहे. तू सांग मुलामध्ये कोणते गुण असावेत." यावर, जास्त वेळ न घेता तिनं म्हटलं, "करणवीर फिट आहे आणि तो नेहमी जिम करतो." यानंतर श्रुतिका अर्जुन म्हणते की, "मला वाटते की चाहतचा त्याच्यावर क्रश आहे." यावर करणवीर म्हणतो, "चाहत, मला तू खूप आवडतेस." यानंतर त्याचं हे बोलणं ऐकूण चाहत लाजून लाल होते आणि हाताने चेहरा लपवते. यावर सलमान खान हा हसायला लागतो. याशिवाय बाकी घरातील सदस्य देखील यावर हसातात.

'वीकेंड का वार' मध्ये 'लाफ्टर शेफ'चे स्टार्स :'वीकेंड का वार'मध्ये कृष्णा अभिषेक, विकी जैन, अंकिता लोखंडे, सुदेश लाहिरी हे 'लाफ्टर शेफ'मधील स्टार्स सामील होणार आहेत. 'बिग बॉस' निर्मात्यांनी एक प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये 'लाफ्टर शेफ'ची टीम 'बिग बॉस'च्या घरामध्ये एंजॉय करताना दिसत आहे. शोमध्ये आपल्या कॉमेडीनं घरातील प्रत्येक सदस्य आणि प्रेक्षकांची मन 'लाफ्टर शेफ'ची टीम जिंकणार असल्याचं प्रोमोमध्ये दाखविण्यात आलं आहे. एका व्हायरल झालेल्या प्रोमोत कृष्णा शोमध्ये दोन टीम बनवतो, 'बिग बॉस'ची आणि दुसरी 'लाफ्टर शेफ'ची टीममध्ये पाककला स्पर्धा आयोजित केली जाते. या दोन्ही गटांना जिलेबी बनवायला सांगण्यात येते. आजचा एपिसोड फुल ऑन मजेशीर असणार आहे.

हेही वाचा :

  1. अविनाश मिश्राला मिळाली राशनची जबाबदारी, 'बिग बॉस'च्या घरात सावळा गोंधळ
  2. नव्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर कडक फौजफाटा, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
  3. अविनाश मिश्राच्या बेघर होण्याच्या घोषणेनंतर ईशा सिंहच्या डोळ्यात अश्रू, विवियन डिसेना आणि रजत दलाल यांच्या होईल बाचाबाची

ABOUT THE AUTHOR

...view details