मुंबई -'बिग बॉस 18'च्या आगामी एपिसोडमध्ये दिग्विजय सिंह राठी आणि अविनाश मिश्रा यांच्यात टाइम गॉडच्या टास्क दरम्यान आज चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे. आता सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमध्ये दिग्विजय आणि अविनाशमध्ये भांडण होताना दिसत आहे. या भांडणामुळे बिग बॉसच्या घरात आणखी एक राडा पाहायला मिळाला आहे.
टास्कदरम्यान दिग्विजय सिंह राठी झाला जखमी :दिग्विजयचे चाहते अविनाशला घरातून हाकलून देण्याची मागणी आता सोशल मीडियावर करत आहेत. याशिवाय काहीजण सोशल मीडियावर असा दावा करत आहे की, दिग्विजयनं स्वयंपाकघरात अविनाशच्या गालावर दोन-तीन झापड मारल्या, त्यामुळे त्याच्यात वाद झाला. सोशल मीडियावर अनेकजण अविनाश मिश्राला गुंडा असल्याचं म्हणत आहेत. यापूर्वी देखील अविनाशनं घरातील काही सदस्यांबरोबर भांडणे केली आहेत.
विवियननं चाहतसाठी बनवली कॉफी :याशिवाय 'बिग बॉस'च्या घरातील आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चाहत पांडे आणि विवियन डीसेना यांच्यात सुंदर संभाषण होताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये चाहत विवियनला विचारते, "डीसेनाजी तुमचं खूप अभिनंदन तुमची कॉफी आली ना, थोडी मला कॉफी मिळेल का ?" यानंतर विवियन तिला होकार देत कॉफी बनवून देतो. यानंतर चाहत कॉफी पित म्हणते, "अरे कॉफी खूप कडू आहे. कॉफी इतकी कडू होती की, ती गळ्यामधून उतरत देखील नव्हती." यानंतर विवियन तिला म्हणतो, "मला आणि माझ्या गोष्टींना हॅन्डल करणे खूप अवघड आहे." यानंतर विवियन तिथून निधून जातो. आता हा व्हिडिओ देखील चाहत्यांना आवडला आहे. यावर देखील लोक भरभरून कमेंट्स करत आहेत.
हेही वाचा :
- 'बिग बॉस 18'च्या घरातील पायजमा पार्टीत करणवीरनं चुमकडे केल्या भावना व्यक्त, व्हिडिओ व्हायरल
- 'बिग बॉस 18'मध्ये विवियन डिसेना बनला पोस्टमन, आता देणार घरातील सदस्यांना धक्का
- विव्हियन त्याच्या माजी पत्नीचा छळ करत होता, सारा खानच्या दाव्यानं बिग बॉसमध्ये खळबळ