मुंबई -Munawar Faruqui : 'बिग बॉस 17'चा विजेता मुनावर फारुकी सध्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. 'बिग बॉस 17' च्या घरातून बाहेर आल्यापासून तो सतत चर्चेत आहे. दरम्यान, अलीकडेच मुनावरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो हिना खानबरोबर दिसत आहे. या फोटोमध्ये मुनावरनं हिनाचा हात धरलेला आहे. फोटोत हिना ही पारंपारिक बंगाली साडीमध्ये आहे. मुनावर चा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हायरल झालेल्या पहिल्या फोटोमध्ये दोघेही एकमेकांचा हात धरून आनंदानं हसताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत दोघेही एकमेकांकडे लक्षपूर्वक पाहत आहेत.
मुनावर फारुकी आणि हिना खानचा फोटो :मुनावर आणि हिनाचा हा फोटो शूट दरम्यान घेण्यात आला होता. आता हे दोघेही कोलकाता येथे एका म्युझिक अल्बमचे शूटिंग करत आहेत. मुनावरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याचे चाहते हा म्युझिक अल्बम पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मुनावर फारुकीन नुकतेच 'बिग बॉस 17' चे विजेतेपद पटकावले आहे. या शोचा फर्स्ट रनर अप अभिषेक कुमार आणि सेकंड रनर अप मन्नारा चोप्रा आहे. हा शो जिंकल्यानंतर मुनावर फारुकीची लोकप्रियता आणखी वाढली आहे. मुनावरचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. 'बिग बॉस 17' संपल्यानंतर एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये मुनावर आणि 'बिग बॉस 17'मधील बाकी स्पर्धकांनी खूप डान्स केला होता. या पार्टीमधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.