मुंबई :Munawar Farooqui won Bigg Boss Season 17 : रिॲलिटी शो 'बिग बॉस शोचे विजेतेपध अखेर मुनव्वर फारुकीने मिळवलं. गेली 105 दिवस चाललेल्या या अटीतटीच्या लढाईत कोण बाजी मारणार याची सर्वच चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर याचा निकाल लागला. मुनव्वर फारुकीच्या नावाची घोषणा झाली. त्याला चाहत्यांकडून सर्वाधिक मत मिळाल्यानं त्याची विजेता म्हणून घोषणा झाली. तर अभिषेक कुमारला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानाव लागलं. तर अभिनेत्री अंकिता लोखंडेला विजेतेपद मिळालं नसल्यानं अनेक चाहत्यांची निराशा झाली.
वाढदिवसालाच विजय संपादन : बिग बॉस सीझन 17 या सलमान खानच्या या शोचा प्रवास 17 स्पर्धकांपासून सुरू झाला. दरम्यान, काही स्टार्स वाइल्ड कार्डच्या रुपात शोचा भाग बनले. सर्वांना मागे टाकत मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण महाशेट्टी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सुरुवातीपासून फारुकीनं शेरोशायरी करत बिग बोसमध्ये वेगळीच छाप पाडली होती. इतर स्पर्धकांच्या तुलनेत पारड जड असल्यानं फारुकीचं विजेता होईल, अशी अनेकांना खात्री होती. मात्र, अखेरच्या क्षणी चाहत्यांच्या मतावरून बिग बॉसचा विजेता ठरणार असल्यानं शेवटच्या क्षणापर्यंत विजेता कोण होणार, याची चाहत्यांना उत्सकुता होती.
मी बिग बॉसचा विजेता ठरल्यानं खूप आनंदी आहे. खूप चाहतावर्ग मिळाल्यानं मी स्वत:ला भाग्यवान समजतो. त्यांचा आभारी आहे. दुःख असो की आनंदाचा काळ मला अशावेळी आई-वडिलांची नेहमीच आठवण येते-स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकी
ग्रँड फिनालेचा भाग : बिग बॉसचा हा सीझन 15 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू झाला. 107 व्या दिवशी या ''शो'ला विजेतेपद मिळालं आहे. 28 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ग्रँड फिनालेचा भाग सुरू झाला. त्यानंतर शोमधून बाहेर पडलेले अनेक स्पर्धक परफॉर्म करताना दिसले. टॉप 5 अंतिम स्पर्धकांपैकी एकेक करून उर्वरित चार स्पर्धक बाहेर पडले. त्यामध्ये अंकिता लोखंडेंचा समावेश असल्याचं पाहून खुद्द शोचा होस्ट असलेल्या सलमान खानलादेखील धक्का बसला.
हे अगोदर बाहेर पडले : हैदराबादचा गेमर अरुण महाशेट्टी हा शोमधून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक होता. त्यानंतर अंकिता लोखंडे आणि नंतर मन्नारा चोप्राही बाहेर पडली. त्यानंतर अभिषेक आणि मुनव्वर यांच्यापैकी मुनव्वर याला सर्वाधिक मते मिळाली. त्यानंतर त्याला या हंगामाचा विजेता घोषित करण्यात आलं. मुनव्वरचा विजयानंतर मुंबईतील डोंगरी येथे स्थानिकांनी आनंद साजरा केला.