मुंबई - Bhuvan Bam :लोकप्रिय यूट्यूबर, अभिनेता, गीतकार, कॉमेडियन आणि गायक भुवन बाम हा सोशल मीडिया स्टार आहे. आज भुवन जगभरात खूप प्रसिद्ध आहे. याचा चाहतावर्ग खूप मोठी असून तो अनेकदा वेगवेगळ्या देशात त्याचे कार्यक्रम करत असतो. भुवनला स्टार बनताना लोकांनी पाहिले असले तरी त्यानं त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात खूप परिश्रम केला आहे. दीर्घ संघर्ष आणि मेहनतीमुळे आज तो लोकप्रिय यूट्यूबर बनला आहे. भुवनचं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य हे नेहमीच चर्चेत असते. दरम्यान आता भुवनबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
भुवन बाम खरेदी केलं दिल्लीत घर : काही दिवसापूर्वी भुवननं दिल्लीत 11 कोटी रुपयांचा आलिशान बंगला खरेदी केल्याचे बोलले जात आहे. या बातमीवर भुवननं आता प्रतिक्रिया दिली आहे. राजधानी दिल्लीत 11 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केल्याच्या वृत्तावर मौन तोडत त्यानं सांगितलं, ''हो मी घर घेतले आहे हे खरे आहे, पण त्याची किंमत 11 कोटी रुपये आहे हे खरे नाही. मला माहित नाही की मी घर खरेदी केल्याची बातमी कशी समोर आली तर, मी याबद्दल माझ्या घरच्यांनाही सांगितलं नाही. मला माझ्या कुटुंबातील व्यक्तीचे कॉल आले, यानंतर मी या विषयी काही बोलू शकलो नाही. घर खरेदी करणं खूप मोठ असते आणि माझ हे स्वप्न पूर्ण झालं आहे.