महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

भूमी पेडणेकरनं 'दलदल' चित्रपटाच्या सेटवर केला वाढदिवस साजरा, घरच्या सरप्राईजनं आले आनंदाचे अश्रू - Bhumi Pednekar - BHUMI PEDNEKAR

Bhumi Pednekar Birthday: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आज 18 जुलै रोजी 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. अलीकडेच तिनं तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या काही क्लिप शेअर केल्या आहेत.

Bhumi Pednekar Birthday
भूमी पेडणेकरचा वाढदिवस (Bhumi Pednekar - Instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 18, 2024, 3:00 PM IST

मुंबई - Bhumi Pednekar Birthday :'दम लगा के हयशा' मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी भूमी पेडणेकर आज 18 जुलै रोजी 35 वर्षांची झाली आहे. भूमीनं 'दलदल'च्या सेटवर तिचा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही खास व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सेटवरून घरी परतल्यानंतर तिला वाढदिवसाचे सरप्राईज मिळाले, यानंतर ती भावूक झाली. भूमी पेडणेकर चाहत्यांना तिच्याबद्दल वेळोवेळी अपडेट शेअर करत असते. तिच्या वाढदिवशी तिनं इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची एक झलक शेअर केली आहे. क्लिपमध्ये ती हात जोडून दिसत आहे. तिच्या समोर टेबलावर एक मोठा केकही ठेवला आहे.

भूमी पेडणेकरचा वाढदिवस (Bhumi Pednekar - Instagram)

भूमी पेडणेकरनं शेअर केले व्हिडिओ : भूमीनं या क्लिपला कॅप्शन दिलं, "माझा वाढदिवस 'दलदल'च्या सेटवर सुरू झाला. मला जिथे जास्त आवडते तिथेच मी काम करते." याशिवाय भूमीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती भावूक होऊन अश्रू पुसताना दिसत आहे. यावर तिनं कॅप्शन दिलं, " घरी आल्यावर मला एक अतिशय सुंदर सरप्राईज मिळाले, ज्यामुळे मी भावूक झाले." याशिवाय तिनं यावर 'आनंदाचे अश्रू' हा हॅशटॅग जोडला आहे. आता अनेक भूमीचे चाहते तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. भूमिनं बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. तिचे अनेक चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट झाले आहेत.

भूमी पेडणेकरचा वाढदिवस (Bhumi Pednekar - Instagram)

भूमी पेडणेकरचे पुरस्कार : भूमी पेडणेकरला 2014 रोजी प्रदर्शित झालेल्या 'दम लगा के हयशा'साठी सर्वोत्तम पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. तसेच तिला झी सिने पुरस्कार, स्टारडस्ट पुरस्कार आणि स्क्रीन पुरस्कार मिळाले आहेत. भूमी पेडणेकर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे इंस्टाग्रामवर 9.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

भूमी पेडणेकरचे टॉप 10 चित्रपट

दम लगा के हयशा (2015)

टॉयलेट: एक प्रेम कथा (2017)

शुभ मंगल सावधान (2017)

बाला (2019)

पति पत्नी और वो (2019)

सांड की आंख (2019)

दुर्गामती (2020)

बधाई दो (2022)

अफवाह (2023)

भक्षक (2024)

ABOUT THE AUTHOR

...view details