मुंबई : अभिनेता अक्षय कुमार अभिनीत 'भूत बंगला' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या आगामी चित्रपटासाठी अक्षय खूप उत्सुक आहे. त्याचा हा चित्रपट हॉरर कॉमेडी असेल. दरम्यान आज 10 डिसेंबर रोजी अक्षयनं आपल्या चित्रपटाबाबत नवीन अपडेट दिली आहे. त्यानं 'भूत बंगला'च्या शूटिंग आणि रिलीज डेटचा खुलासा केला आहे. अक्षय कुमारनं मंगळवारी 10 डिसेंबर रोजी त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर चित्रपटामधील पोस्टर शेअर केलं. या पोस्टरवर चित्रपटाची रिलीज डेट देण्यात आली आहे. आता त्याचे चाहते 'भूत बंगला' चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. अक्षय कुमारला देखील त्याच्या या आगामी चित्रपटाबद्दल खूप अपेक्षा आहेत.
'भूत बंगला'ची शूटिंग आणि रिलीज डेट आली समोर : दरम्यान 'भूत बंगला'बद्दल माहिती देताना, अक्षय कुमारनं त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'आज आम्ही आमच्या हॉरर कॉमेडी 'भूत बंगला'चे शूटिंग सुरू करत आहोत, त्यामुळे मी माझ्या आवडत्या प्रियदर्शनबरोबर सेटवर येण्यासाठी खूप उत्सुक आहे. भीती आणि हास्याचा हा दुहेरी डोस तुमच्यासाठी 2 एप्रिल 2026 रोजी तयार असेल. आता आम्हाला तुम्ही शुभेच्छा द्या.'अक्षयच्या वाढदिवसाला निर्मात्यांनी या प्रोजेक्टची घोषणा केली होती. चित्रपट निर्माते प्रियदर्शननं अक्षय कुमारचे या चित्रपटामधील पोस्टर इंस्टाग्रामवर रिलीज करून लिहिलं होतं, '14 वर्षांनंतर मी माझा मित्र अक्षय कुमारबरोबर पुन्हा एका हॉरर-कॉमेडी चित्रपटात काम करत आहे. एकता कपूरबरोबर काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. काही खास गोष्टीसाठी सज्ज व्हा. 'भूत बंगला.'