मुंबई- कार्तिक आर्यनचा बहुप्रतीक्षित 'भूल भुलैया 3' चा ट्रेलर बुधवारी जयपूरमधील राज मंदिरात लाँच करण्यात आला. ट्रेलरने २४ तासांत इतिहास रचला असून, सर्वाधिक पाहिलेला हिंदी ट्रेलर बनला आहे. कार्तिकने एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यानं लिहिले आहे की, 'भूल भुलैया 3' च्या ट्रेलरने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. हा सर्वात जास्त पाहिला जाणारा हिंदी ट्रेलर ठरला आहे.
'सिंघम अगेन'लाही टाकलं मागं
'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' हे दोन मोठे चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये भिडणार आहे. दोघांचे ट्रेलरही जवळपास रिलीज झाले आहेत. पहिल्यांदा 'सिंघम अगेन'चा ट्रेलर रिलीज झाला जो प्रेक्षकांना खूप आवडला आणि त्याला २४ तासांत १३८ व्ह्यूज मिळाले. बुधवारी, कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया'चा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरला 24 तासांत 155 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे 'भूल भुलैया 3' ने 'सिंघम अगेन'लाही व्ह्यूजच्या बाबतीत मागं टाकलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना कार्तिक आर्यनने लिहिले, ''इतके प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद, हे दिवाळी एक चक्रव्यूह आहे.'' पोस्टरवर लिहिले आहे - ''ऐतिहासिक, 'भूल भुलैया 3' ने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत, 24 तासांत 155 दशलक्षपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेला हा पहिला हिंदी ट्रेलर ठरला आहे.''