महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आलिया भट्टनंतर 'लाफ्टर क्वीन' भारती सिंगनं लावला कानामागे काळा टिळा - BHARATI SINGH - BHARATI SINGH

Bharti Singh 'Nazar Ka Tika': भारती सिंग 'लाफ्टर शेफ'च्या सेटबाहेर दिसली. तिनं कोणाची नजर लागू नये यासाठी कानामागे काळा टिळा लावला आहे.

Bharti Singh
भारती सिंग ((Photo-IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 4:12 PM IST

मुंबई - Bharti Singh :'लाफ्टर शेफ' हा स्वयंपाकावर आधारित नवीन रिॲलिटी शो आहे. हा शो नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा शो जिंकण्यासाठी अनेक स्टार्सनी यात सहभाग घेतला होता. या शोमध्ये कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, निया शर्मा-सुदेश लाहिरी, भारती सिंग, जन्नत झुबेर रहमानी, रीम शेख, अली गोनी, राहुल वैद्य, विकी जैन, अंकिता लोखंडे आहेत. गेल्या मंगळवारी, 11 जूनला 'लाफ्टर क्वीन' भारती सिंग 'लाफ्टर शेफ'च्या सेटबाहेर स्पॉट झाली. पिवळ्या रंगाचा पंजाबी सूट आणि लांब वेणीमध्ये भारती सुंदर दिसत होती. यावेळी पापाराझींशी बोलताना तिनं आपला लूकबद्दल काही सुंदर अशा गोष्टी केल्या.

भारती सिंगचा लूक आला चर्चेत :भारती सिंगनं पापाराझीला सांगितलं की, तिनं 'कभी खुशी कभी गम'मधील काजोलचा लूक केला आहे. या चित्रपटामध्ये काजोलनं सलवार सूट घातला होता आणि तिचा हा लूक अनेकांना आवडला होता. भारती सिंगनं पापाराझींशी खूप मजेदार गप्पा मारल्या. यानंतर मुंबईमधील ह्यूमिडिटीबद्दल पापाराझींला भारतीनं विचारलं. यावर पापाराझींनी तिला स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला. यानंतर भारतीनं तिचे फोटो काढल्याबद्दल पापाराझींचं आभार मानले. यावेळी भारतीच्या कानामागील काळ्या चिन्हानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारती अनेकदा काळा टिळाही लावताना दिसली आहे. याशिवाय बॉलिवूडमधील काही स्टार्स देखील कानामागे असा टिळा किंवा तीट लावतात.

मेट गाला 2024 मध्ये आलिया भट्टचं ब्लॅक मार्क: यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट काळ्या रंगाचा टिळा लावला होता. यावर्षी, मेट गालामध्ये ती भारतीय परंपरेचे प्रतिनिधित्व करत या कार्यक्रमात साडीत दिसली होती. तिचं सौंदर्य वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी आलियानं तिच्या कानामागे काळा टिळा लावला होता. काही वेळातच ही बातमी सोशल मीडियावर पसरली. आता भारती सिंग देखील वाईट नजरेपासून स्वतःला वाचवण्यासाठी काळा टिळा लावला आहे. भारती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा आपल्या मुलाबरोबरचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

हेही वाचा :

  1. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवीन प्रोमो रिलीज, रॅपर बादशाह करणार 'सनसनाटी' खुलासा - The great indian kapil show
  2. 'ॲनिमल' चित्रपटाबद्दल आदिल हुसैनच्या वादग्रस्त वक्तव्यावर भडकला दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा - Sandeep Vanga and Adil Hussain
  3. चंकी पांडेनं आदित्य रॉय कपूरबरोबर फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी विचाराला 'हा' विशेष प्रश्न - Aditya roy kapoor and chunky pandey

ABOUT THE AUTHOR

...view details