मुंबई - Bhaiyya Ji Trailer out : गुंडांच्या भूमिकेत मनोज बाजपेयी 'भैय्या जी'मध्ये दिसणार आहे. आता 'गँग्स ऑफ वासेपूर'सारखी कहाणी 'भैय्या जी' या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. 'भैय्या जी' या चित्रपटामधील मनोजचे अनेक सिनिस्ट लूक्स आधीच समोर आले आहेत. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर आज 9 मे रोजी रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूप थरारक आहे. आता अनेक चाहत्यांना हा ट्रेलर खूप आवडला आहे. या चित्रपटामध्ये मनोज बाजपेयी हा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. 'भैय्या जी'चा खळबळजनक ट्रेलर सध्या खूप चर्चेत आहे. या ट्रेलरला अवघ्या काही तासात अनेक लोकांनी लाईक केलं आहे.
'भैय्या जी'चा ट्रेलर रिलीज :'भैय्या जी' हा मनोज बाजपेयीच्या करिअरमधील 100 वा चित्रपट आहे. 'फॅमिली मॅन' आणि 'सिर्फ एक बंदा ही काफी है' यांसारख्या काही सॉफ्ट चित्रपटांमध्ये मनोज हा साधारण भूमिकेत दिसला होता. मनोज पुन्हा एकदा त्याच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' अवतारात दाखल होत आहे. 'भैय्या जी' चित्रपटात विपिन शर्मा, झोया हुसैन आणि जतिन गोस्वामी हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट 24 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सुविंदर पाल विकी हा चित्रपटात खलनायकच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.