मुंबई - प्रसिद्ध गायक एड शीरनचा कार्यक्रम 8 फेब्रुवारी 2025 रोजी बेंगळुरू पोलिसांनी मध्येच थांबवला, त्यानंतर पोलिसांची कारवाई अजूनही चर्चेत आहे. आता एडचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तो बेंगळुरूमधील चर्च स्ट्रीटवर लाईव्ह परफॉर्मन्स देताना दिसत आहे. लोकप्रिय ब्रिटिश गायक एड शीरन सध्या भारत दौऱ्यावर आहे. तो वेगवेगळ्या शहरांमध्ये कॉन्सर्ट करत आहे. आता त्याचा कॉन्सर्ट बेंगळुरूमध्येही आहे. स्टेज शोपूर्वी बंगळुरूमधील लोकांना आकर्षित करण्यासाठी, एडनं स्ट्रीटवर लाईव्ह परफॉर्मन्स दिला. आता ही परफॉर्मन्स त्याला महागात पडली आहे. सध्या एड शीरन त्याच्या शोपेक्षा या व्हायरल व्हिडिओमुळे जास्त चर्चेत आला आहे.
एड शीरन कायदेशीर अडचणीत : एड शीरन त्याच्या स्टेज शोपूर्वी बेंगळुरूमधील स्ट्रीटवर गाण्याचा शो केल्यामुळे अडचणीत सापडला आहे. चर्च स्ट्रीटवरील फूटपाथवर सादरीकरण करत असताना पोलिसांनी त्याचा कार्यक्रमात मध्येच थांबवला. शीरनंच्या टीमनं सांगितलं की, एका गाण्याच्या सादरीकरणासाठी प्रशासकीय परवानगी घेण्यात आली आहे. पण त्यानंतरही पोलीस अधिकाऱ्यानं त्याच्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं. आता एडच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.