मुंबई - अभिषेक बच्चन सध्या त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'आय वॉन्ट टू टॉक' 22 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. याचं दिग्दर्शन शुजित सरकार यांनी केलं आहे. यापूर्वी त्यानं 'पिकू' सारख्या उत्कृष्ट चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अभिषेक बच्चन आणि शूजित सरकार यांनी एका मुलाखतीत त्यांच्या 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाबद्दल सांगितलं. यावेळी अभिषेक बच्चननंही पत्नी ऐश्वर्या रायबद्दल बोलण्याच्या ओघोत काही भाष्य केलं.
अभिषेकनं मुलाखतीत आई जया बच्चन, पत्नी ऐश्वर्या, मुलगी आराध्या आणि कुटुंबाविषयी खास गोष्टी सांगितल्या आहेत. अलीकडे अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात बिनसल्याची चर्चा जोरात आहे. यामध्ये कितपत सत्य आहे याबद्दल कोणीही उघडपणे बोललेलं नाही. अशातच अभिषेकचं नाव त्याची 'दसवी' चित्रपटाची सहकलाकार निम्रत कौर हिच्याबरोबर जोडलं गेल्यानं अनेक प्रकारच्या बातम्या समोर आल्या आहेत.
'मी बदलू शकत नाही' - अभिषेकनं एका मुलाखतीत म्हटले आहे की, 'मी जसा आहे तसाच राहीन. मी बदलू शकत नाही.' तडजोडी करण्याची मनःस्थितीत तो नाही. चांगुलपणा आणि त्याच्या मूलभूत नियमांना चिकटून राहणं चांगले आहे, असंही त्याचं मत आहे. अभिषेक म्हणाला की, "नकारात्मकतेवर लक्ष केंद्रित केल्यानं आपल्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो, मी माझ्या आयुष्यात सकारात्मकतेचा शोध घेत आहे, लाखो अडचणी आल्या तरी मी माझ्या आशा कायम ठेवतो."
पत्नी ऐश्वर्याबद्दल काय म्हणाला अभिषेक बच्चन?- दरम्यान, पत्नी ऐश्वर्या रायबाबत अभिषेकनं म्हटलं आहे की, "ती खूप चांगली आई आहे आणि मुलगी आराध्याचे खूप छान संगोपन करत आहे. मी खूप नशीबवान आहे. मी घराबाहेर राहून चित्रपट करतो आणि ऐश्वर्या घरी राहून मुलीची काळजी घेते. याबद्दल खरोखर तिचे आभार मानले पाहिजेत.परंतु मला नाही वाटत की मुलं याकडे अशा प्रकारे पाहात असतील. ते तुम्हाला त्रयस्त व्यक्ती म्हणून पाहात नाहीत."
ऐश्वर्या रायनं अभिषेकबरोबरचा चित्रपट का नाकारला?- लग्नानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या राय या जोडीनं 'रावण' (2010) या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर हे स्टार कपल कोणत्याही चित्रपटात पुन्हा एकत्र दिसले नाही. बातम्यांनुसार ऐशनं तिचा पती अभिषेकबरोबर 2014 मध्ये आलेल्या 'हॅपी न्यू इयर' चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. शाहरुख खान, सोनू सूद, दीपिका पदुकोण, बोमन इराणी, जॅकी श्रॉफ, विनोद खन्ना आणि विवान शाह यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अभिषेक देखील होता. अशा परिस्थितीत फराहने ऐशला ही भूमिका ऑफर केली होती, मात्र त्यासाठी ऐश्वर्यानं नकार दिला होता. एका मुलाखतीतही ऐश्वर्या रायनं हा चित्रपट नाकारल्याच मान्य केल होत.
अभिषेक बच्चनचं पालकांबद्दल भाष्य- आपल्यासाठी आई-वडील जे करू शकतात ते कोणीही करू शकत नाही, अस अभिषेकन सांगितल. पालक वेळोवेळी त्यांचे प्रेम कसे दाखवतात याबद्दलही तो बोलला. अभिषेक म्हणाला होता की, बाप सगळं काही करत असतो पण त्याबद्दल गप्प राहतो. कारण त्याला ते कसं व्यक्त व्हायचं हे कळत नाही. पुरुष आणि स्त्रीया यामध्ये नेमका हाच मूलभूत फरक आहे. त्याचबरोबरच अभिषेकनं त्याची आई जय बच्चन यांनाही एक महान आई असं म्हटलं आहे.
एप्रिल 2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांनी शाही पद्धतीने लग्न केलं होतं. तर आराध्याचा जन्म 2011 मध्ये झाला होता. अलीकडेच ऐश्वर्या रायनं तिची मुलगी आराध्याचा 13 वा वाढदिवस साजरा केला, ज्यामध्ये बच्चन कुटुंबातील एकही सदस्य दिसला नव्हता.