मुंबई - 'गुड न्यूज' चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर याचा प्रीक्वेल बनणार असल्याची घोषणा झाली तेव्हापासून 'बॅड न्यूज' हा चित्रपट चर्चेत आहे आहे. विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि अॅमी विर्क यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट आज १९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटानं आधीच हसण्यासाठी भाग पाडणाऱ्या ट्रेलरपासून ते ताल धरायला लावणाऱ्या गाण्यांपर्यंतचे प्रमोशनल आयटम्स दिलेले आहेत. चित्रपटाभोवती जोरदार चर्चा असल्यानं, तो अपेक्षा पूर्ण करू शकला का हा प्रश्न बाकी राहतो. पहिल्या दिवशी पहिला शो पाहणाऱ्या प्रेक्षकांनी चित्रपट पाहिल्यानंतर तातडीनं त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करायला सुरूवात केली आहे.
'बॅड न्यूज'चा पहिला शो पाहिलेल्या एका युजरनं लिहिलंय, "बॅड न्यूज हा चित्रपट विनोद, नाटक आणि भावना यांचं आनंददायी मिश्रण आहे. भरपूर विनोदी प्रसंग, विनोदी वन-लाइनर्स आणि आकर्षक कथानकामुळे हा चित्रपट भरपूर मनोरंजनाची खात्री देतो."
आणखी एकानं, चित्रपटाला थम्स अप देऊन शेअर केले: "बॅड न्यूज चित्रपट हिट आहे.. विनोदी वन-लाइनर्स आणि आकर्षक कथानकांसह मनोरंजन आणि कॉमेडी चित्रपट विकी कौशल फुल ऑन. खूपच भारी काम केलंय. तृप्ती डिमरीचा चांगला आणि हॉट रोल आहे. अॅमी विर्कची जबरदस्त कॉमेडी."
आणखी एका युजरनं हा चित्रपट हिट असल्याचं घोषित केलं: "विकी कौशलचा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक मनोरंजक राइड आहे! विनोदी वन-लाइनर, उत्तम प्रकारे जुन्या गाण्यांसह, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट बनणार आहे."
एका X युजरनं 'बॅड न्यूज'ला 4 स्टार दिले आणि चित्रपटातील विकीच्या अष्टपैलू कामाचं, डिमरीची चुंबकीय स्क्रीन उपस्थिती आणि चित्रपटाच्या फायद्यासाठी अॅमीनं दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला आहे. अनेक युजर्स हा चित्रपट हिट असल्याचं सांगत चित्रपट पाहण्याचं आवाहन करत आहेत.
हा नाट्यमय विनोदी चित्रपट तृप्ती डिमरीच्या पात्राभोवती फिरतो. ती जुळ्या मुलांसाठी गर्भवती आहे. तिच्या या प्रेग्नंसीला वैद्यकीयदृष्ट्या हेटेरोपॅटर्नल सुपरफेकंडेशन असे म्हटले जाते. या चित्रपटाचा रनटाइम 2 तास आणि 22 मिनिटांचा आहे आणि सेन्सॉर बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) द्वारे U/A रेटिंग प्रमाणित केले आहे. हा चित्रपट आनंद तिवारी यांनी दिग्दर्शित केला आहे आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने बनवला आहे.
हेही वाचा -
- विकी कौशल: इंटेन्स भूमिकांनंतर मी हलक्याफुलक्या भूमिका करण्याला प्राधान्य देतो! - Vicky Kaushal Exclusive Interview
- 'बॅड न्यूज'ची ॲडव्हान्स बुकिंगमध्ये धमाकेदार कमाई, सेन्सॉर बोर्डानं चालवली तीन चुंबन दृष्यांवर कात्री - Bad Newz
- दररोज नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे : तृप्ती डिमरी! - Tripti Dimri Exclusive Interview