मुंबई : अभिनेता वरुण धवनचा चित्रपट 'बेबी जॉन' आता थिएटरमध्ये दाखल झाला आहे. ख्रिसमस डे (25 डिसेंबर) निमित्त 'बेबी जॉन' रिलीज झाला आहे. वरुण धवनचा हा 2024 साली आलेला पहिला आणि शेवटचा चित्रपट आहे. त्याचबरोबर 'बेबी जॉन' चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगली कमाई केली केली आहे. 'बेबी जॉन'चे निर्माते 'जवान'चे दिग्दर्शक ॲटली आहेत.तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन कलिश यांनी केलंय. आता 'बेबी जॉन'च्या स्टार कास्टच्या भूमिका आणि त्यांच्या फीबद्दल जाणून घेऊया. 'बेबी जॉन'मधील कॅमिओसाठी सलमान खाननं किती फी घेतली ते या बातमीमधून समजून येईल.
वरुण धवन : अभिनेता वरुण धवननं 'बेबी जॉन' या ॲक्शन ड्रामा चित्रपटात दोन भूमिका (सत्या वर्मा आणि बेबी जॉन) केल्या आहेत. या चित्रपटामधील त्याचा अभिनय अनेकांना आवडला आहे. 'बेबी जॉन' चित्रपटामधील त्याला दोन भूमिका साकारण्यासाठी 25 कोटी रुपये मानधन मिळालं आहे.
कीर्ती सुरेश : सत्या वर्माची पत्नी मीराची भूमिका साऊथ ब्युटी कीर्ती सुरेशनं साकारली आहे. कीर्तीनं 'बेबी जॉन' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. या चित्रपटासाठी तिला 4 कोटी रुपये मानधन मिळालं आहे.
जॅकी श्रॉफ : 'बेबी जॉन' या चित्रपटात जॅकी श्रॉफला खलनायक बब्बर शेरची भूमिका मिळाली. एका रिपोर्टनुसार जॅकीला या भूमिकेसाठी 1.5 कोटी रुपये मिळाले आहेत.