महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रणवीर सिंगनं वडील झाल्याचा आनंद रिलायन्स इव्हेंटमध्ये केला व्यक्त, व्हिडिओ व्हायरल - Ranveer Singh - RANVEER SINGH

Ranveer Singh : रणवीर सिंग वडील झाल्यानंतर पहिल्यांदाच एका कार्यक्रमात दिसला. त्यानं पापाराझींबरोबर वडील झाल्याचा आपला आनंद व्यक्त केला.

Ranveer Singh
रणवीर सिंग (रणवीर सिंग (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2024, 12:30 PM IST

मुंबई Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी 8 सप्टेंबर 2024 रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. वडील झाल्यानंतर, रणवीर हा एका कार्यक्रमात आपल्या अनोख्या अंदाजात दिसला. रविवारी, 29 सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात त्यानं वडील झाल्याचा आनंद व्यक्त केला. तो आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोण सध्या पालक झाल्याचा आनंद घेत आहेत. रणवीर हा नवजात बाळाची काळजी घेण्यासाठी घरीच होता. तो अनेक दिवसांपासून कुठल्याही कार्यक्रमात झळकला नाही. वडील झाल्यानंतर तो पहिल्यांदाच बाहेर पडला होता.

रणवीर सिंगनं वडील झाल्याचा आनंद केला व्यक्त : सुमारे 20 दिवसांनंतर, रणवीरनं मुंबईतील अंबानींच्या आलिशान निवासस्थान अँटिलिया येथे आयोजित 'युनायटेड इन ट्रायम्फ' या भव्य कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात 140 ऑलिंपियन आणि पॅरालिम्पियन त्यांचे यश साजरे करण्यासाठी आले होते. 'युनायटेड इन ट्रायम्फ'मध्ये सहभागी होण्यापूर्वी, रणवीर पापाराझींबरोबर फोटोसाठी पोझ देण्यासाठी ग्रीन कार्पेटवर गेला. फोटो दिल्यानंतर त्यानं फोटोग्राफर्सशी हस्तांदोलन करत "मी वडील झालो" असं म्हटलं. आता रणवीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये अनेक चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

रणवीर सिंगचा लूक :'युनायटेड इन ट्रायम्फ'च्या कार्यक्रमात रणवीर सिंग थ्री पीस सूटमध्ये दिसला. यावर त्यानं एक चेन आणि सनग्लास लावला होता. आता त्याचा हा लूक त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, 'एक वडील झाल्यानंतर रणवीर हा खूप खुश आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, वडील झाल्यानंतर रणवीरच्या चेहऱ्यावर एक चमक आली आहे.' आणखी एका चाहत्यानं लिहिलं, 'हा खूप सुंदर वडील होईल.' दरम्यान रणवीर आणि दीपिका यांनी 8 सप्टेंबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पालक झाल्याची गोड बातमी शेअर केली होती. या जोडप्यानं सांगितलं की, त्यांना मुलगी झाली आहे. रणवीर आणि दीपिका यांच हे पहिलं अपत्य आहे. या जोडप्यानं 2018 मध्ये इटलीतील लेक कोमो येथे लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत.

हेही वाचा :

  1. मजबूत शरीरसौष्ठवासह रणवीर सिंगनं सुरू केली 'डॉन 3'ची तयारी, पाहा व्हायरल फोटो - Ranveer Singh Don 3
  2. शाहरुख खाननं दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नवजात कन्येला दिली भेट, व्हिडिओ व्हायरल - SHAH RUKH Meets DEEPIKAS BABY GIRL
  3. पालकत्वाबद्दल 'आय एम लिजन्ड'री शुभेच्छा! दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचं विल स्मिथकडून अभिनंदन - DEEPIKA PADUKONE

ABOUT THE AUTHOR

...view details