मुंबई - Ayan Mukerji Raha :चित्रपट निर्माता अयान मुखर्जी रविवारी 5 मे रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मुलगी राहा कपूरबरोबर एका कॅफेबाहेर दिसला. आता राहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तिच्याबरोबर अयान मुखर्जी दिसत आहे. अयाननं राहाला कडेवर घेतले आहे. आता तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावेळी त्यानं कॅज्युअल निळा टी-शर्ट आणि पांढरा शॉर्ट्स घातला होता, तर रणबीर-आलियाच्या राजकुमारी राहानं प्रिंटेड पायजमा सेट परिधान केला होता. कारच्या दिशेनं जात असताना राहाच्या हातात एक पाकीट दिसलं होत.
राहा कपूरचा व्हिडिओ व्हायरल : यानंतर अयाननं त्याच्यामागून येणाऱ्या लोकांवर नाराजी व्यक्त केली आणि तो त्याच्या गाडीच्या दिशेकडे गेला. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा अयान खूप जवळचा आहे. दरम्यान या व्हायरल व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या व्हिडिओवर एकानं लिहिलं, "राहा ही तिच्या आजोबा ऋषी कपूरसारखी दिसते." दुसऱ्या एकानं लिहिलं, "राहा खूप क्यूट आहे, तिचे डोळे खूप सुंदर आहे." आणखी एकानं लिहिलं, "राहा आलियासारखी दिसते." याशिवाय काहीजण या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करून राहावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.