महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

"भूतकाळाच्या पिंजऱ्यात अडकायचं की भविष्याचा वेध घ्यायचा..." : अर्जुन कपूरची गूढ पोस्ट - Arjun Kapoor Cryptic Post - ARJUN KAPOOR CRYPTIC POST

Arjun Kapoor Cryptic Post : अर्जुन कपूरच्या इन्स्टाग्रामवरील गूढ पोस्टमुळे मलायका अरोराबरोबरच्या त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल संशयाचं वातावरण तयार झालंय. या दोघांच्या बिनसल्याचा चर्चा सुरू झाल्या आहेत. असं असलं तरी मलायकाच्या प्रतिनिधीनं हा दावा नाकारला आहे.

Arjun Kapoor Cryptic Post
अर्जुन कपूरची गूढ पोस्ट ((ANI/ETV Bharat))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 1, 2024, 4:15 PM IST

मुंबई - Arjun Kapoor Cryptic Post : अर्जुन कपूर त्याची दीर्घकाळाची जोडीदार मलायका अरोराबरोबर विभक्त झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, त्यानं सोशल मीडियावर एक गूढ संदेश शेअर केला आहे. मलायकाच्या प्रवक्त्याने एका वेबलॉइडला दिलेल्या मुलाखतीत ब्रेकअपच्या अफवा फेटाळल्याच्या एका दिवसानंतर अर्जुनची ही पोस्ट आली आहे.

अर्जुन कपूरनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक पोस्ट लिहिली आहे. "आपल्याला आयुष्यात दोन पर्याय आहेत. आपण आपल्या भूतकाळाच्या पिंजऱ्यात अडकून राहू शकतो किंवा भविष्याचा वेध घेणारे असू शकतो.", असं त्यानं इंग्रजीत लिहिलं आहे. 2018 मध्ये मलायकाच्या 45 व्या वाढदिवसानिमित्त या दोघांनी त्यांच्या नात्याला अधिकृतपणे दुजोरा दिला होता.

अर्जुन कपूरची गूढ पोस्ट (Arjun Kapoor Instagram story grab image)

कथित ब्रेकअपबद्दल विचारले असता, मलायकाच्या प्रतिनिधीनं सांगितलं होतं की, "तसं काहीही नाही, या सर्व अफवा आहेत." मलायकाचं यापूर्वी अरबाज खानशी लग्न झालं होतं. या जोडप्याला अरहान खान हा एक मुलगा आहे.

यापूर्वी अनेक बातम्यांनुसार मलायका आणि अर्जुन या विभक्त व्हायचा निर्णय घेतला असून तरीही ते एकमेकांना मान देतात आणि या संवेदन काळात फारशी वाच्याता करणं टाळतात, असं म्हटलं होतं. त्यांनी आपल्या नात्याला विराम देण्याचा निर्णय सहमतानं घेतल्याचंही सांगितलं जातंय.

अर्जुन कपूर वर्कफ्रंट

अर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटचा विचार करता तो अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि रणवीर सिंग यांच्याबरोबर रोहित शेट्टीच्या आगामी सिंघम अगेन चित्रपटामध्ये दिसणार आहे. अर्जुन कपूर या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिंघम (2011) आणि सिंघम रिटर्न्स (2014) च्या यशानंतर, ऑगस्ट 2024 मध्ये रिलीज होणारा हा चित्रपट लोकप्रिय फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे.

हेही वाचा -

  1. आर माधवन वाढदिवस : प्रतिभावान अभिनेत्याचा प्रवास, टॉप 5 चित्रपट, हिट गाणी आणि आगामी चित्रपट - R Madhavan Birthday
  2. जून महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका, पाहा कोणत्या मालिका, चित्रपट होणार रिलीज - OTT attractions of June
  3. सुपरस्टार रजनीकांत यांनी बद्रीनाथ धाम मंदिरात पूजा करून घेतले आशीर्वाद - Rajinikanth spiritual journey

ABOUT THE AUTHOR

...view details