मुंबई :एआर. रहमान आणि त्याची पत्नी सायरो बानो यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे. लग्नाच्या 29 वर्षांनंतर हे जोडपे वेगळे झाले आहेत. दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे रहमान आणि त्यांच्या पत्नीनं 19 नोव्हेंबर रोजी घटस्फोटाची घोषणा केली. यानंतर काही तासांनी त्यांच्या बँडमधील सदस्य मोहिनी डेनं देखील तिच्या पतीपासून वेगळे होण्याची घोषणा करून एक मोठा झटका दिला. मोहिनीमुळे एआर. रहमान आणि सायरा बानो वेगळे झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. सोशल मीडियावर लोक रहमान आणि मोहिनी नात्यात असल्याचा अंदाज लावत आहेत. या सगळ्यात रहमानच्या वकील वंदना शाह यांनी आपले मौन सोडले असून, 'मोहिनीचा एआर रहमान आणि सायरा बानो यांच्या घटस्फोटाशी काहीही संबंध नाही. हा निर्णय त्यांनी स्वतः घेतला असल्याचं सांगितलंय.
एआर. रहमान आणि मोहिनी डेच्या नात्याबद्दल चर्चा :वंदना यांनी म्हटलं, 'प्रत्येक लग्नात चढ-उतार येत असतात आणि त्यांच्यासोबतही असेच काहीसे घडत होते, मला आनंद आहे की त्यांनी एकमेकांच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आणि वेगळे होण्याचा निर्णय घेतला. विभक्त झाल्यानंतरही रहमान आणि सायरा नेहमीच एकमेकांच्या बाजूनं उभे राहतील. एआर. रहमान आणि सायरा यांना तीन मुले आहेत. दाम्पत्याची मुलेही त्यांच्या निर्णयाला सध्या पाठिंबा देत आहेत. सध्या आर्थिक मुद्द्यावर या जोडप्यांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. हा निर्णय दोघांनी परस्पर घेतला आहे. एआर रहमान आणि सायरा बानो यांच्या कोणतेही मतभेद नसल्याचं सांगितलं जात आहे.