मुंबई - APRIL FOOL : 'एप्रिल फूल' हा एक मजेदार दिवस आहे. आज 1 एप्रिल रोजी अनेकजण आपल्या ओळखीच्या लोकांना मुर्ख बनवून हा दिवस साजरा करतात. लक्षात ठेवा की या दिवशी फक्त तुमच्या ओळखीच्या व्यक्तींनाच एप्रिल फूल बनवा, नाहीतर तुम्ही भांडण ओढवून घेऊ शकता. या सुंदर दिवशी 'बडे मियाँ छोटे मियाँ'मधील स्टार्स अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी खूप मस्ती केली आहे. 'एप्रिल फूल'ला टायगरनं अक्षय कुमारला चांगलंच फसवलंय. त्याच्याबरेबर जबरदस्त प्रँक केला आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या ॲक्शनपॅक जोडीनं आता चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
टायगर अक्षयबरोबर केला प्रँक :अक्षय आणि टायगरनं चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी एक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये टायगर श्रॉफ शर्टलेस होऊन थंड कोक पेयाची बाटली हलवताना दिसत आहे. यानंतर अक्षय कुमार बागेत शिरताना दिसतो. अक्षय येताच टायगर त्याला कोल्ड ड्रिंकची बॉटल देण्यास सांगतो. यानंतर अक्षय ती बॉटल उघडताच गॅसने भरलेली कोल्ड ड्रिंक थेट अक्षयच्या तोंडावर फवाऱ्याप्रमाणे उउडते आणि पार्श्वभूमीत गाणे वाजते... 'एप्रिल फूल बनाया', यानंतर तिथे सर्व लोक हसतात. अक्षय आणि टायगरचा हा व्हिडिओ अनेकांना खूप आवडला आहे. या व्हिडिओवर अनेकजण भरभरून कमेंट्स करत आहेत.