मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर क्वचितच तिच्या वैयक्तिक आयुष्याची झलक दाखवत असते. आता तिनं मुलगा अकाय आणि मुलगी वामिकाबरोबर बालदिन साजरा केला. या सेलिब्रेशनची एक झलक तिनं सोशल मीडियावर शेअर केली आहे, यामध्ये बालदिनाचा खास मेनू दाखवला गेला आहे. बालदिननिमित्त अनुष्कानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर बाजरी नूडल्सचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'बालदिन मेनू - स्माईल, लाफ्टर आणि बाजरीचे नूडल्स.' दरम्यान अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियात आहेत.
अनुष्का शर्माचा बालदिन मेनू : यापूर्वी हे जोडपे पर्थमधील एका कॅफेबाहेर मुलगी वामिकाबरोबर दिसले होते. यानंतर त्यांचे सोशल मीडियावर काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. याशिवाय 5 नोव्हेंबर रोजी विराट कोहलीनं त्याचा 36वा वाढदिवस कुटुंबाबरोबर साजरा केला होता. अनुष्का शर्मानं मुलांसोबत विराटचा एक सुंदर फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान अनुष्का आणि विराटनं डिसेंबर 2017 मध्ये इटलीमध्ये लग्न केलं. जानेवारी 2021मध्ये त्यांनी मुलगी वामिकाचं स्वागत केलं. या वर्षी फेब्रुवारीमध्ये या जोडप्याला अकाय हा मुलगा झाला.