मुंबई - Anupam Kher and Junior NTR : दिग्गज अभिनेता अनुपम खेर त्यांच्या दमदार अभिनयामुळे आणि सशक्त व्यक्तिरेखेसाठी नेहमीच चर्चेत असतो. याशिवाय तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.अनुपम खेर आणि साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अलीकडेच अनुपमने मुंबईत ज्युनियर एनटीआरची भेट घेतली. यानंतर त्यानं हा फोटो आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला. याशिवाय त्यानं या पोस्टवर एक कौतुक करणारी नोट लिहिली होती. त्यांनी या नोटवर लिहिलं, "काल रात्री माझ्या आवडत्या व्यक्तींपैकी एक अभिनेता ज्युनियर एनटीआरला भेटून खूप आनंद झाला. मला त्याचे काम खूप आवडते. तो दिवसेंदिवस पुढे जात राहो."
ज्युनियर एनटीआर आणि अनुपम खेरचा व्हिडिओ व्हायरल : अनुपम आणि ज्युनियर एनटीआरला एकत्र पाहून अनेकांना वाटले की, दोघेही एका चित्रपटामध्ये दिसणार आहे. अनुपम खेर यानं शेअर केलेल्या फोटोत तो क्रीम रंगाच्या पॅन्ट आणि पांढऱ्या शर्टमध्ये दिसत आहेत. दुसरीकडे ज्युनियर एनटीआर राखाडी पॅन्ट आणि काळ्या टी-शर्टमध्ये आहे. या फोटोसाठी दोघेही एकत्र सुंदर पोझ देताना दिसत आहेत. आता दोघेही कोणत्या कार्यक्रमात भेटले याचा खुलासा अद्याप झालेला नाही. आता हा फोटो अनेकांना आवडत आहे. या फोटोवर अनेकजण कमेंट करून ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटाबद्दल वाट पाहात असल्याचं सांगताना दिसत आहे.