मुंबई - Ajay Devgan : हिंदी चित्रपटसृष्टीचा 'सिंघम' अजय देवगण त्याच्या आगामी स्पोर्ट्स बायोपिक 'मैदान'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यासाठी फक्त 4 दिवस उरले आहेत. या चित्रपटात अजय देवगण भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीमच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय स्पोर्ट्स बायोपिकमध्ये काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान अजयनं फुटबॉल सोडून क्रिकेटमध्ये हात आजमावला आहे. अजय देवगणनं त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो क्रिकेट खेळताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना अजयनं लिहिलं, ''आज वेगळ्या मैदानावर पण जोश बदलला नाही.''
अजय 'मैदान' रिलीजपूर्वी खेळला क्रिकेट :शेअर केलेल्या फोटोमध्ये अजयबरोबर माजी क्रिकेटर हरभजन सिंग देखील क्रिकेट खेळताना दिसत आहे. दरम्यान अजयच्या डॅशिंग लूकबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं काळ्या पॅन्टसह पांढऱ्या टी-शर्टवर ऑलिव्ह कलरचं जॅकेट परिधान केलं आहे. लूक आणखी सुंदर करण्यासाठी त्यानं सनग्लास लावला आहे. अजयचे चाहतेही या फोटोंवर सुंदर प्रतिक्रिया देऊन त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अजयच्या एका चाहत्यान या पोस्टवर लिहिलं, ''मी पहिल्याच दिवशी 'मैदान' चित्रपट पाहणार.'' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, ''अजय सरांचं लूक खूप सुंदर आहे.'' आणखी एका चाहत्यांनं लिहिलं, ''फुटबॉल पण खेळायला पाहिजे.''