महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'स्लमडॉग मिलेनियर'ला 16 वर्षे पूर्ण, जीवन समृद्ध केल्याची अनिल कपूरची प्रतिक्रिया - 16 YEARS OF SLUMDOG MILLIONAIRE

'स्लमडॉग मिलेनियर'ला 16 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अनिल कपूरनं एक पोस्ट लिहिली आहे. या चित्रपटामुळं जीवन समृद्ध झाल्याचं त्यानं म्हटलंय.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 12, 2024, 8:09 PM IST

मुंबई - 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटानं 2009 मध्ये इतिहास रचला होता. भारताच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या या चित्रपटाला ऑस्करसाठी 10 नामांकनं मिळाली होती आणि त्यातील 8 श्रेणीमध्ये या चित्रपटाला विजय मिळाला होता. या प्रतिष्ठित चित्रपटाला रिलीज होऊन 16 वर्षे पूर्ण होत असताना, अभिनेता अनिल कपूरने चित्रपटाबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत.

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अनिल कपूरनं चित्रपटातील स्टील फोटोंचा एक कोलाज पोस्ट केला आहे. या चित्रपटामुळे त्याला मिळालेल्या संधी आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम यावर एक नेटही लिहिली आहे. "१२ नोव्हेंबर रोजी, १६ वर्षांपूर्वी, स्लमडॉग मिलेनियर उत्तर अमेरिकेत रिलीज झाला आणि संपूर्ण जगतात वणव्यासारखा पसरला... वेळ कसा उडून जातो कळत नाही. हा चित्रपट देत राहतो, या चित्रपटामुळं केवळ प्रेमळ नातेसंबंधांनी माझे जीवन समृद्ध केलं नाही तर , आजच्या जगात आर्थिक मदत करणे सुरू ठेवलं, नी बॉयल, पॉल स्मिथ आणि ख्रिश्चन कोल्सन यांच्यामुळेच हे शक्य होऊ शकलं." असं अनिल कपूर यांनी म्हटलंय.

'स्लमडॉग मिलेनियर'ला 16 वर्षे पूर्ण, अनिल कपूरची पोस्ट (ANI)

2008 मध्ये रिलीज झालेला स्लमडॉग मिलेनियर हा चित्रपट विकास स्वरूप यांच्या प्रश्नोत्तर या कादंबरीवर आधारित होता आणि जमाल मलिक या मुंबईच्या झोपडपट्टीतील तरुणाची कथा यात चितारण्यात आली होती. एक झोपडपट्टीत राहणारा मुलगा हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेअर या क्विझ शोमध्ये भाग घेतो आणि तो विजयी होतो अशी ही कथा होती. देव पटेल यानं मुख्य भूमिका केली होती, तर अनिल कपूरनं करिश्मॅटिक गेम शोचे होस्ट प्रेम कुमार ही व्यक्तीरेखा साकारली होती. कालातीत विषय असलेला हा चित्रपट संपूर्ण जगातील प्रेक्षकांना सुखद धक्का देऊन गेला. या चित्रपटामुळेच एआर रहमानचं संगीत पुन्हा एकदा जगभरात गुंजलं आणि देव पटेल सारख्या अभिनेत्याला जगभर लोकप्रियता मिळाली. आजही हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतात.

सध्या कामाच्या आघाडीवर अनिल कपूर 'सुभेदार' या नाट्यमय चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट सुरेश त्रिवेणी यांनी दिग्दर्शित केला आहे. विक्रम मल्होत्रा, सुरेश त्रिवेणी आणि अनिल कपूर या चित्रपटाचे निर्माते म्हणून काम करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details