मुंबई - Call Me Bae Trailer : अभिनेत्री अनन्या पांडे ही लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. आता तिचे चाहते तिला 'कॉल मी बे' या वेब सीरीजमध्ये पाहण्यासाठी खूप आतुर आहेत. 'कॉल मी बे'च्या रिलीज डेटचा देखील खुलासा झाला आहे. याशिवाय या वेब सीरीजचा ट्रेलर हा कधी प्रदर्शित होणार याबद्दलदेखील माहिती समोर आली आहे. अनन्या पांडेनं तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या आगा मी वेब सीरीज 'कॉल मी बे'चं एक पोस्टर रिलीज केलं आहे. यामध्ये तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "सगळा ड्रामा फक्त दोन दिवसात उलगडणार आहे. 'कॉल मी बे'चा ट्रेलर 20 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल."
'कॉल मी बे'बद्दल आली माहिती समोर: आजपासून दोन दिवसांनी अनन्या पांडेच्या वेब सीरीजची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे. अनन्या पांडे स्टारर ही वेब सीरीज 6 सप्टेंबरपासून प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. या वेब सीरीजमध्ये अनन्या पांडे व्यतिरिक्त वीर दास, वरुण सूद,गुरफतेह सिंग, विहान समत, मुस्कान जाफरी सारखे कलाकार आहेत. या वेब सीरीजमध्ये अनन्या पांडेचा चाहत्यांना अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे. अनन्याला या वेब सीरीजकडून खूप अपेक्षा आहेत.