मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा त्यांच्या प्रोफेशनल गोष्टींसह वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीतरी शेअर करत असतात. दरम्यान, इतकंच नाही तर त्यांना काही नवं सूचलं अथवा काही कल्पना मनात आली तरीही ते चाहत्यांशी शेअर करतात. पण नुकतेच अमिताभ यांनी असं काही ट्विट केले ज्यामुळे चाहते संभ्रमात पडले.
अमिताभ यांचा पारा चढला -
अमिताभ यांनी X या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये 'शट अप' असं लिहिलं आणि त्याच्यासह एक संतप्त इमोजी देखील जोडला. हे पाहून असं वाटतंय की, बिग बींना एखाद्या गोष्टीचा राग आला आहे आणि ते रागाने कोणाला तरी गप्प राहण्यास सांगत आहेत. त्यांच्या या ट्विटने नेटकऱ्यांचा गोंधळ उडाला आहे कारण अमिताभ यांनी हे संतप्त ट्विट कोणाबद्दल केले आहे हे त्यांना समजू शकले नाही.
अभिषेक आणि ऐश्वर्यामधील घटस्फोटांच्या अफवांमुळं भडकले का बच्चन?
काही लोक अमिताभच्या या ट्विटला अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवेशी जोडत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा सुरू होत्या आणि बच्चन कुटुंबात काय सुरू आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर ही चर्चा सर्वत्र सुरू आहे. कदाचित बिग बींनी या अफवांच्या संदर्भात हे ट्विट केलं असलं तरी ते तसं स्पष्ट झालेलं नाही.
सोशल मीडियावर बच्चन कुटुंबीयांनी ऐश्वर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्यानं अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या अटकळांना जोर चढला होता. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात ते एकत्र दिसले नव्हते तेव्हापासून या चर्चा घडत आल्या आहेत. दरम्यान, अभिषेक आणि निम्रत कौरच्या डेटिंगच्या अफवाही जोरात आहेत. या अफवांवर अद्यापपर्यंत अभिषेक आणि ऐश्वर्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अमिताभ 'कल्की 2898 एडी' या चित्रपटामध्ये अखेरचे दिसले होते ज्यामध्ये त्यांनी प्रभास आणि दीपिका पदुकोणबरोबर स्क्रीन शेअर केली होती.