मुंबई - Kalki 2898 AD : नाग अश्विनच्या 'कल्की 2898 एडी' मधील दिग्गज बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या दमदार व्यक्तिरेखेबद्दल गेल्या काही महिन्यांपासून बरीच चर्चा होती. या चित्रपटात 'बिग बीं'ची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचं म्हटलं जात आहे. 'कल्की 2898 एडी' चा नवीन प्रोमो आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्या आयपीएल सामन्यादरम्यान शेअर करण्यात आला. 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या टीझरमधून अमिताभ बच्चन या आगामी चित्रपटात अश्वत्थामाची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं आहे. टीझर प्रोमोच्या सुरुवातीला एक लहान मुलगा बिग बींना विचारतो की, ते कधीच मरणार नाहीत हे खरे आहे काय ? नंतर यावर अमिताभ म्हणतो, 'द्वापर युगापासून दशावताराची वाट पाहत आहे. द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा.'
'कल्की 2898 एडी' व्हिडिओ प्रोमो रिलीज :'कल्की 2898 एडी' च्या टीझर प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हटक्या अंदाजात दिसत आहे. व्हिडिओ अमिताभ यांचा संपूर्ण चेहरा कापडानं झाकलेला दिसत आहे. यानंतर तोंडावरचा चिखल आणि त्याच्या डोळ्यातील चमक दाखवली गेली आहे. आता अमिताभ यांचा हा लूक सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अनेकाना हा लूक पाहून 'जवान' चित्रपटाची आठवण झाली आहे. 'कल्की 2898 एडी' व्हिडिओ प्रोमोवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया मांडताना दिसत आहेत. या व्हिडिओवर एका चाहत्यानं लिहिलं, "अमिताभ यांचा हा लूक खूप दमदार आहे, हा चित्रपट नक्कीच हिट होईल." दुसऱ्या एकानं लिहिलं, "हा चित्रपट मी पहिल्या दिवशी पाहायला जाईल.' आणखी एकानं लिहिलं, "अमिताभ हा लूक शाहरुख खानच्या 'जवान'सारखा आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.