महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अमिताभ बच्चन यांनी म्हटलं, 'मी कचरा करणार नाही', चाहत्यांनी दिल्या विशेष प्रतिक्रिया - Amitabh Bachchan - AMITABH BACHCHAN

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांचे चाहते खूप प्रभावित झाले आहेत. अमिताभ यांचा हा व्हिडिओ काही सेकंदांचा आहे.

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन (अमिताभ बच्चन (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2024, 7:25 PM IST

मुंबई Amitabh Bachchan :मेगास्टार अमिताभ बच्चन सध्या त्यांचा प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती 16' च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असून दररोज फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ते चाहत्यांबरोबर कनेक्टेड राहतात. आता अमिताभ यांनी एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांनी लोकांना विचार करायला भाग पाडलं आहे. व्हिडिओत अमिताभ हे पिवळ्या ट्रॅक सूटमध्ये असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत अमिताभ हे एक संदेश देत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला व्हिडिओ :त्यांनी व्हिडिओत म्हटलं, "मी कचरा करणार नाही धन्यवाद." या व्हिडिओच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी देशवासियांना स्वच्छ भारत अभियानाचा संदेश दिला आहे. 'बिग बी' यांचा हा व्हिडिओ बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर आला आहे. 'बिग बीं'च्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. या व्हिडिओवर एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं, "तुम्ही बोलले विषय संपला." दुसऱ्या एकानं लिहिलं, "तुम्ही जे म्हणाल, ते आम्ही करू, मी कचरा करणार नाही." आणखी एकानं लिहिलं, "मी पण कचरा करणार नाही सर." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्टवर करून अमिताभ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांचा वर्कफ्रंट :27 जून 2024 रोजी रिलीज झालेल्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात अमिताभ दिसले होते. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर सुपरहिट झाला. या चित्रपटामध्ये त्यांच्याबरोबर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि साऊथ अभिनेता प्रभास हे मुख्य भूमिकेत होते. आता अमिताभ बच्चन साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ॲक्शन कॉमेडी ड्रामा फिल्म ''वेट्टैयान'मध्ये दिसणार आहेत. 'वेट्टैयान' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रतीक्षा सध्या अनेकजण करत आहेत.

हेही वाचा :

  1. अमिताभ बच्चनची नात नव्यानं आयआयएमएमध्ये घेतला प्रवेश, 'त्याचा' फोटो शेअर करत मानले आभार - Navya Naveli
  2. "मी जया अमिताभ बच्चन...", ऐकून सभापती मोठ्यानं हसले, जाणून घ्या सभागृहात नेमकं काय घडलं? - Jaya Bachchan in Rajya Sabha
  3. अमिताब बच्चन यांचं नाव घेताच का भडकल्या जया बच्चन? - Jaya Bachchan got angry

ABOUT THE AUTHOR

...view details