मुंबई- Thalaiyava with Big B : मेगास्टार अमिताभ बच्चन आणि साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या 'वेट्टियाँ' चित्रपटाच्या शूटिंगला एकत्र सुरुवात केली आहे. दोन्ही सुपरस्टार 3 मे रोजी सेटवर एकत्र काम करताना दिसले. बिग बी अमिताभ आणि 'थलैयवा' रजनीकांत 33 वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. शूटिंग सेटवरील दोन्ही सुपरस्टारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्वतः अमिताभ बच्चनने 33 वर्षांनंतर रजनीकांतच्या बरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. बिग बीने सोशल मीडियावर रजनीकांत बरोबरचा एक अविस्मरणीय फोटो शेअर केला आहे.
रजनीकांत अजिबात बदललेला नाही - अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर रजनीकांतबरोबरचा एक सुंदर आणि संस्मरणीय फोटो शेअर केला आणि लिहिले, 'थला द ग्रेट रजनीबरोबर पुन्हा काम करताना मला सन्मान वाटतो, तो अजिबात बदललेला नाही, तीच नम्रता, तीच, जमिनीशी जोडलेली मानव, महानता'. . आता या सुपरहिट जोडीवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दोन्ही सुपरस्टार्सला एकाच फ्रेममध्ये पाहण्यासाठी चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. एका चाहत्याने लिहिले, 'सुपरस्टार आणि बिग बी'. दुसऱ्या एका चाहत्याने लिजेंड्स असे लिहिले आहे. तिसरा चाहता लिहितो, 'एका फ्रेममध्ये दोन दिग्गज'.