महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2'साठी अल्लू अर्जुन या 6 शहरांना देणार भेट, जाणून घ्या कुठल्या शहरात लॉन्च होणार ट्रेलर - ALLU ARJUN TOUR FOR PUSHPA 2

'बाहुबली 2' नंतर सर्वाधिक प्रतीक्षा सुरू असलेला अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' च्या रिलीजचे वेध सुरू झालेत. एका भव्य सोहळ्यात याचा ट्रेलर लॉन्च पार पडणार आहे.

Allu Arjun
अल्लू अर्जुन ((Pushpa 2 Film Poster))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 4, 2024, 5:16 PM IST

मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीतील आजवर सर्वाधिक प्रतीक्षा सुरू असलेल्या 'पुष्पा : द रुल' या चित्रपटाच्या रिलीजचं काउंट डाऊन सुरू झालं आहे. या चित्रपटातून अभिनेता अल्लु अर्जुन पुष्पाराजच्या भूमिकेत पुन्हा परतणार आहे. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट 5 डिसेंबर 2024 रोजी जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल. 4 डिसेंबर 2024 रोजी जागतिक स्तरावर त्याचा विशेष प्रीमियर पार पडणार आहे. याआधी 'पुष्पा 2' चित्रपटाच्या निर्मात्यांनी या अ‍ॅक्शनपॅक एंटरटेनरसाठी एक मोठा मार्केटिंग प्लॅन तयार केला आहे. जाणून घेऊया काय आहे 'पुष्पा 2' च्या प्रमोशनची ही खास योजना.

अल्लू अर्जुन-रश्मिका मंदान्ना देणार देशातील 6 शहरांना भेटी - मिळालेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि चित्रपटाची कलाकारांसह टीम नोव्हेंबर महिन्यापासून 6 शहरांच्या मोठ्या टूरसाठी सज्ज होणार आहे. अल्लू अर्जुन 15 नोव्हेंबरपासून पाटणा, कोची, चेन्नई, बेंगळुरू, मुंबई आणि हैदराबादला भेट देणार आहे. या 6 शहरांचा दौरा 15 नोव्हेंबरच्या सुमारास मेगा ट्रेलर लॉन्च कार्यक्रमानं सुरू होईल. 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चचा भव्य कार्यक्रम 15 नोव्हेंबरला पाटणा येथे पार पडणार आहे.

आजवरचे भारतातील कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढणार 'पुष्पा 2' - 'पुष्पा 2' हा चित्रपट बाहुबली 2 इतकाच तीव्रपणे प्रेक्षक वाट पाहात असलेला सीक्वेल चित्रपट आहे. हा सिनेमा भारतीय सिनेमाच्या कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढेल असं म्हटलं जातंय. येत्या 30 दिवसांत सर्वकाही ठरलेल्या प्लॅननुसार व्यवस्थित राहिल्यास, 'पुष्पा 2' हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सलामीवीर, तसेच भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनून हिंदीमध्ये नवीन उंची गाठू शकतो. सध्या प्रेक्षक ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ५ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या आधी 'पुष्पा 2' हा चित्रपट 6 डिसेंबरला रिलीज होणार होता पण आता तो 5 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details