महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुन कुटुंबासह दुबईच्या सुट्टीवर, 'पुष्पा 2'बद्दल आली अपडेट - Allu Arjun - ALLU ARJUN

Allu Arjun : सुपरस्टार अल्लू अर्जुन कुटुंबासह सध्या दुबईच्या सुट्टीवर आहे. आता सोशल मीडियावर अल्लूची पत्नी स्नेहा रेड्डीनं दुबईतील फॅमिली व्हेकेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. याशिवाय अल्लूनं सोशल मीडियावर 'पुष्पा 2' चित्रपटाबद्दल अपडेट दिली आहे.

Allu Arjun
अल्लू अर्जुन

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 6:06 PM IST

मुंबई - Allu Arjun :साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2'मुळे चर्चेत आहे. दुबईतील मादाम तुसाद म्युझियममध्ये नुकताच पुष्पा उर्फ अल्लूचा मेणाचा पुतळा बसवण्यात आला. आपल्या मेणाच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी तो कुटुंबासह दुबई गेला होता. आता अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासह दुबईत चांगला वेळ घालवताना दिसत आहे. दरम्यान अल्लूची पत्नी स्नेहा रेड्डीनं दुबईतील फॅमिली व्हेकेशन आणि एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये स्नेहा तिच्या मैत्रींबरोबर डिनर करताना दिसत आहे. याशिवाय तिनं शेअर केलेल्या व्हिडिओत अल्लू अर्जुन आपल्या फोनमध्ये सुंदर कारंज्याचे दृश्य टिपताना दिसत आहे.

अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन दिली चाहत्यांना भेट : या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन हा काळ्या टी-शर्टसह पांढऱ्या रंगाच्या पॅन्टमध्ये दिसत आहे. तसेच दुसऱ्या एका फोटोत स्नेहा पिवळ्या वन-पीस ड्रेसमध्ये मिररमध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. यानंतर शेअर केलेल्या आणखी एका व्हिडिओत अल्लू अर्जुन दुबईच्या प्रसिद्ध जावेट पॉइंटवर आपल्या मुलांबरोबर खेळताना सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. दरम्यान थोड्या वेळपूर्वीचं अल्लूनं 'पुष्पा 2' चित्रपटाबद्दल एक अपडेट दिली आहे. त्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं 'पुष्पा 2'चे टीझर कधी रिलीज होईल याबद्दल सांगितले आहे. 'पुष्पा 2' या चित्रपटाचा टीझर हा अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला म्हणजेच 8 एप्रिल रोजी रिलीज करण्यात येणार आहे.

स्नेहा रेड्डी
अल्लू अर्जुन

'पुष्पा 2' चित्रपटाबद्दल :'पुष्पा 2' या चित्रपटाची अनेकजण वाट पाहात आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटाबरोबर रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये रुपेरी पडद्यावर मोठी टक्कर पाहायला मिळेल. 'पुष्पा 2' चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलंय. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना, साई पल्लवी, विजय सेतुपती, फहाद फाजिल, प्रियामणी, श्रीतेज, जगपती बाबू, प्रकाश राज, सुनील, राव रमेश आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

स्नेहा रेड्डी

हेही वाचा :

  1. सलमान आणि अर्जुन कपूरचे संबंध ताणल्याची बोनी कपूरनं दिली कबुली - Boney Kapoor
  2. गरोदर असल्याच्या बातमीची परिणीतीनं काढून टाकली हवा, मिश्कील पोस्टसह केलं खंडण
  3. प्रियांका चोप्रासह निक जोनास लॉस एंजेलिसला परतले, फोटो केले शेअर - Nick and Priyanka

ABOUT THE AUTHOR

...view details