महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आलिया भट्टचा टाईम मॅगझिनच्या सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीत समावेश - Alia Bhatt - ALIA BHATT

Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्टचा टाईम मॅगझिनच्या 2024 मधील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे. याबद्दलचा आनंद व्यक्त करत तिनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Alia Bhatt
आलिया भट्ट

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 3:47 PM IST

मुंबई - Alia Bhatt : टाईम मॅगझिनच्या 2024 मधील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समाविष्ट झाल्यानंतर आलिया भट्टला आकाश ठेंगणं झालं आहे. ब्रिटीश लेखक आणि दिग्दर्शक टॉम हार्पर यांनीही आलियाचं तिच्या कामाच्याप्रती असलेल्या श्रद्धेबद्दल कौतुक केलंय. अलिकडेच आलियाने टॉम हार्पर दिग्दर्शित 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यातील तिच्या भूमिकेच जगभर कौतुक झालं होतं.

टॉम हार्परने लिहिलेल्या मासिकाच्या लेखात आलियाचा उल्लेख "खरोखरची आंतरराष्ट्रीय स्टार" असा केला आहे. "मी आलियाला तिच्या हॉलीवूड पदार्पण असलेल्या हार्ट ऑफ स्टोनच्या सेटवर भेटलो. ती खोडकर असल्याचं ऐकलं होतं पण सेटवर काम करताना मला ती नम्र आणि विनोदी वाटली. ती शिस्तबद्ध असल्यानं आणि तिच्याकडे ग्रहण करण्याची शक्ती असल्यानं याचं प्रतिबिंब कामात उमटल्याचं दिसलं. ती संधीचा लाभ घेताना कचरत नाही."

टॉम हार्पर पुढे म्हणाले, "आलियाची सुपरपॉवर ही तिची सत्यता, संवेदनशीलता आणि चुंबकीय फिल्म स्टार म्हणून मेळ घालण्याची क्षमता तिच्याकडे आहे. एक अभिनेत्री म्हणून, ती चमकदार आहे आणि एक व्यक्ती म्हणून ती खऱ्या अर्थाने विश्वासार्ह आणि सर्जनशील आंतरराष्ट्रीय स्टार आहे."

टाईम मॅगझिनच्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश होणं हे सन्मानाचं असल्याचं आलियानं म्हटलंय. तिनं एक क्लिप शेअर करुन दिग्दर्शक टॉम हार्पर यांनी केलेल्या कौतुकाबद्दल त्यांचं आभार मानले आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातील भूमिकेसाठी आलियानं गेल्या वर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कार जिंकले होते.

टाईम मॅगझिनच्या प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये आलिया भट्टशिवाय भारतीय वंशाचा अभिनेता देव पटेल आणि कुस्तीपटू साक्षी मलिक यांचाही समावेश करण्यात आलाय. कामाच्या आघाडीवर आलियानं अलीकडेच करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये भूमिका केली होती. आगामी काळात तिच्याकडे वासन बालाचा 'जिगरा' हा चित्रपट आहे. या चित्रपटाची ती सह-निर्माती देखील आहे.

हेही वाचा -

  1. शीर्षक गीत आणि गडबड गीतानंतर परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा'चा धमाल ट्रेलर लॉन्च - Nach Gam Ghuma
  2. 'दो और दो प्यार' स्क्रिनिंगमध्ये एका वृद्ध महिलेनं बॉलिवूड स्टार्सला मारली मिठी, आली चर्चेत - DO AUR DO PYAAR SPECIAL SCREENING
  3. शिल्पा शेट्टीला धक्का : राज कुंद्रा मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीनं इतक्या कोटींची संपत्ती केली जप्त - ED Attached Shilpa Shetty Property

ABOUT THE AUTHOR

...view details