मुंबई - Raha and Ranbir Kapoor:अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांची लाडकी मुलगी राहा ही खूप लोकप्रिय आहे. जेव्हाही राहा घराबाहेर पडते, तेव्हा तिचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. अलीकडे राहाचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राहा ही चालताना दिसत आहे. तिची क्यूटनेस आता अनेकांना आवडत आहेत. अनेकजण तिच्या या व्हिडिओला पसंत करत आहेत. राहाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पापाराझीनं रविवारी 28 जुलै रोजी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राहाबरोबर तिचे वडील रणबीर कपूर देखील दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ वांद्रे येथील आहे.
राहा कपूरचा व्हिडिओ व्हायरल :व्हिडिओमध्ये राहा ऑफ व्हाइट आणि ब्राऊन कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचे केस पोनीटेलमध्ये बांधले असून यामध्ये ती खूपच गोड दिसत आहे. राहानं परिधान केले गुलाबी शूज तिच्या लूकला आणखी क्यूट बनवत आहे. राहाच्या मागे रणबीर कपूर हा येत आहे. व्हायरल व्हिडिओत रणबीरचा ऑल ग्रे लूक होता. याशिवाय दुसऱ्या एका व्हिडिओत रणबीर कपूर आपली मुलगी राहाला कडेवर घेताना दिसत आहे. व्हिडिओत रणबीर आणि राहा दोघेही घराच्या आत जात असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओवर एका चाहत्यानं लिहिलं, "ती लहान आलियासारखी दिसते, खूप सुंदर." दुसऱ्यानं यावर लिहिलं, "किती छान राहा आता चालायचं देखील शिकली." आणखी एकानं लिहिलं, "राहा खूपचं क्यूट आहे, ती आपल्या आजोबा सारखी दिसते." याशिवाय या व्हिडिओवर अनेकजण हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.