मुंबई - Poacher London Screening:आजकाल आलिया भट्ट तिच्या अभिनयाबरोबर फॅशन सेन्समुळे चर्तेत असते. अवॉर्ड शो आणि प्रमोशनल इव्हेंटमध्ये आलिया सुंदर पोशाख परिधान करून तिच्या चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. आता आलियाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती खूप आकर्षक दिसत आहे. तिच्या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, 'पोचर' या वेब सीरीजच्या स्क्रिनिंगसाठी लंडनला पोहोचलेल्यानंतर आलिया काळ्या साडीत होती. डिझायनर सब्यसाचीच्या कलेक्शनमधून घेतलेली ब्लॅक वेलवेट फॅब्रिक सोनेरी गोंडस बॉर्डर असल्यानं ही साडी रॉयल दिसत होती. आलियानं या साडीवर सुंदर स्लीव्हलेस ब्लाउज घातलं होतं.
आलिया भट्टचारॉयल लुक :आलिया भट्टनं या साडीवर मोत्याचा हार आकर्षक घातला होता. तिनं केसं बनमध्ये बांधले होते. चमकदार लाल लिपस्टिक आणि कमीतकमी डोळ्यांच्या मेकअपसह तिनं तिचा लूक परिपूर्ण केला होता. आलियाचे साडीतील फोटो समोर आल्यानंतर चाहते तिचं कौतुक करत आहेत. या कार्यक्रमात तिच्यासोबत तिची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्टदेखील होती. आलियानं या कार्यक्रमामधील काही सुंदर फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तिच्या फोटोवर तिच्या एका चाहत्यानं लिहिलं, ''आलिया मी तुझा खूप मोठा चाहता आहे. तुझे फोटो खूप सुंदर असतात. याशिवाय दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, ''तू बॉलिवूडची राणी आहे.'' आणखी एका चाहत्यानं लिहिलं, ''कुठल्याही ड्रेसमध्ये आलिया खूप सुंदर दिसते.'' अशा अनेक कमेंट्स तिच्या पोस्टवर चाहते करत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहोत.
- 'पोचर' वेब सीरीज : आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते रिची मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या 'पोचर'मध्ये निमिषा सजयन, रोशन मॅथ्यू आणि दिव्येंदू भट्टाचार्य यांच्या भूमिका आहेत. या वेब सीरीजची कहाणी हत्तींच्या शिकारीवर आधारित आहे. 23 फेब्रुवारी रोजी 'पोचर' अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.