महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

"प्रेमाच्या विशाल मिठीत बिलगली कपूर फॅमिली" : रणबीरच्या वाढदिवशी आलियानं शेअर केले कौटुंबिक क्षण - Ranbir Kapoor birthday - RANBIR KAPOOR BIRTHDAY

Ranbir Kapoor birthday : रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी आलिया भट्टनं इंस्टाग्रामवर गोड आणि सुंदर कौटुंबिक फोटो शेअर केले आहेत. यात रणबीर, त्यांची मुलगी राहा आणि स्वतः आलिया यांच्यातील प्रेमाचं अतुट नात दिसून येतंय. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळंही हा फोटो आणखी खास बनला आहे.

Ranbir Kapoor
रणबीर कपूर ((Photo: IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2024, 3:37 PM IST

मुंबई - अभिनेता रणबीर कपूर आज, २८ सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसाच्या निमित्तानं त्याची पत्नी, अभिनेत्री आलिया भट्टनं सोशल मीडियावर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या 8 कोटी फॉलोअर्सची मनं जिंकणाऱ्या सुंदर कौटुंबिक क्षणांची मालिकाच तिनं शेअर केली आहे.

आलिया भट्टनं इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये आलिया, तिचा पती रणबीर कपूर आणि त्यांची मुलगी राहा एका झाडाला मिठी मारताना त्यांच्या नात्यातील सुंदर क्षण दाखवताना दिसते. या फोटो पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं आहे की, "कधीकधी तुम्हाला फक्त एका मोठ्या मिठीची गरज असते.. आणि तुम्ही आयुष्य एकसारखे अनुभवता," त्यानंतर रणबीरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना तिनं "हॅपी बर्थडे बेबी," असं लिहिलंय.

ग्रे कलरचा ब्लेझर आणि हलकी जीन्स घातलेली आलिया एका हातानं झाडाला धरून रणबीरवरील प्रेम व्यक्त करताना दिसतेय. या फोटोमध्ये रणबीर कपूर कॅज्युअल, ड्रेसमध्ये अतिशय शांत दिसत आहे. त्यांची मुलगी राहा आता एक वर्षाची झाली आहे. तिनंही गुलाबी पँटसह पांढरा स्वेटशर्ट परिधान करून, प्रेमाच्या या कौटुंबिक मिठीत स्वतःला सामील करत या फोटोलाही अर्थपूर्ण बनवलं आहे.

आलियानं पोस्ट केलेल्या इतर फोटोमध्ये त्यांच्या नात्यातील गोड क्षण कॅप्चर झाले आहेत. आजवर दोघांनीही आपल्या मुलीला प्रसिध्दीच्या स्पॉटलाइटपासून दूर ठेवले आहे. फॅन्स आणि सेलिब्रिटींनी या पोस्टवर अनेक प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेता अर्जुन कपूरने आपल्या कमेंटमध्ये लिहिलंय, "विजयासाठीचा दुसरा फोटो." चित्रपट निर्माते गुनीत मोंगा कपूर यांनी लिहिलंय, "वाढदिवसाच्या शुभेच्छा."

कामाच्या आघाडीवर बोलायचं झालं तर, आलिया आणि रणबीर दोघांचेही अनेक रंजक प्रोजेक्ट सुरू आहेत. आलिया भट्ट आगामी 'अल्फा'मध्ये शर्वरी वाघ हिच्याबरोबर दिसणार आहे, हा चित्रपट खूप अपेक्षा निर्माण करणारा आहे. दुसरीकडे, रणबीर, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटाच्या रिलीजसाठीची तयारी करत आहे. यामध्ये तो आलिया आणि विकी कौशल यांच्याबरोबर काम करत आहे. दोन्ही कलाकार यशस्वी करिअर आणि कौटुंबिक जीवनाचा समतोल साधत, पडद्यावर आणि बाहेरही प्रेक्षकांना आपलंसं करत आहेत.

हेही वाचा -

रणबीर कपूरनं 'धूम 4' साइन केली!, चित्रपटात बनेल खलनायक ? - dhoom 4 Movie

रणबीर कपूरचा वाढदिवस झाला भव्य, आकाश अंबानींपासून ते अर्जुन कपूरपर्यंत 'या' सेलिब्रिटींनी लावली हजेरी - Ranbir Kapoor Birthday

ABOUT THE AUTHOR

...view details