मुंबई - Ranbir Kapoor and Alia Bhatt : बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांमध्ये गणले जाणारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतात. अलीकडेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह एकत्र दिसले. आलियानं 12 मे रोजी रात्री तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कुटुंबातील काही सदस्य दिसत आहेत. या फोटोत दोनच सदस्य बेपत्ता आहेत. आलिया भट्टच्या या खास पोस्टमागे एक खास कारण आहे. मदर्स डेच्या निमित्तानं तिनं हा फोटो पोस्ट केला आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनीही त्यांच्या आईसाठी खास सेलिब्रेशन केलंय.
आलिया भट्टनं कुटुंबाबरोबर शेअर केला फोटो: व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये आलियाची बहीण शाहीन भट्ट आणि तिची आई सोनी राजदान तिच्याबरोबर दिसत आहेत. याशिवाय रणबीर कपूरची आई नीतू कपूरही या फोटोत आहेत. संपूर्ण कुटुंब एकत्र आहे आणि सर्वांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत. हे सर्वजण बाल्कनीत पसरलेल्या गादीवर बसून फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. फोटोत नीतू कपूरनं पांढऱ्या रंगाची छत्री धरली आहे. हा फोटो पोस्ट करत आलिया भट्टनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "माझ्या मौल्यवान लोकांबरोबर अनमोल क्षण. मदर्स डेच्या शुभेच्छा." हा फोटो पाहिल्यानंतर आता आलियाचे चाहते या फोटोवर कमेंट्स करून तिला मदर्स डेच्या शुभेच्छा देत आहेत.