महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्रियदर्शनबरोबर अक्षय कुमार त्याच्या वाढदिवशी हॉरर कॉमेडी चित्रपटाची करणार घोषणा - Akshay Kumar - AKSHAY KUMAR

Akshay Kumar : अक्षय कुमार दिग्दर्शक प्रियदर्शनबरोबर हॉरर-कॉमेडी चित्रपट घेऊन येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अक्षयच्या 57व्या वाढदिवसाला या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज होणार आहे.

Akshay Kumar
अक्षय कुमार (अक्षय कुमार (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2024, 6:32 PM IST

मुंबई Akshay Kumar :बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार दिग्दर्शक प्रियदर्शनबरोबर एक हॉरर-कॉमेडी चित्रपट करणार असल्याचं बोललं जात आहे. 'खट्टा मीठा'च्या 14 वर्षानंतर दोघे पुन्हा एकत्र येणार आहेत. या चित्रपटाची घोषणा 9 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा 57वा वाढदिवस आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करून चाहत्यांना एक मोठं सरप्राईज देऊ शकतो. या दिवशी या चित्रपटाचं शीर्षक देखील समोर येईल. अक्षयनं 'हेरा फेरी', 'भूल भुलैया', 'भागम भाग', 'दे दना दान', 'खट्टा मीठा' आणि 'गरम मसाला' यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये प्रियदर्शनबरोबर काम केलय.

अक्षय कुमारचा येईल हॉरर-कॉमेडी चित्रपट : प्रियदर्शन हा चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर बनवण्यासाठी जुलैमध्ये मुंबईत आला होता. या हॉरर कॉमेडी चित्रपटाची शूटिंग या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 2025 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे शूटिंग केरळ, हैदराबाद आणि श्रीलंकेच्या जंगलात होणार आहे. यानंतर शेवटचे शेड्यूल गुजरातमध्ये शूट केले जाईल. मोशन पोस्टरमध्ये अक्षयच्या व्यक्तिरेखेची माहिती समोर येण्याची शक्यता असली तरी, अद्याप या चित्रपटाबाबत अधिकृतपणे काहीही समोर आलेलं नाही. या चित्रपटात अक्षय हा तीन अभिनेत्रींबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. चित्रपटाची थीम काळ्या जादूवर असणार आहे.

आगामी चित्रपटात असणार तीन अभिनेत्री : या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये एकता कपूर देखील योगदान देणार आहे. अक्षयच्या हॉरर-कॉमेडी चित्रपटात साऊथ अभिनेत्री कीर्ती सुरेश, कियारा अडवाणी आणि आलिया भट्ट एकत्र स्क्रिन शेअर करणार असल्याची चर्चा आहे. अक्षयच्या कारकिर्दीतील हा तिसरा हॉरर-कॉमेडी चित्रपट असेल. याआधी अक्षय 'भूल भुलैया'मध्ये दिसला होता. त्याचा हा चित्रपट अनेकांना आवडला होता. तसंच त्यानं श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2'मध्ये कॅमिओ केला आहे. अक्षयच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या 'जॉली एलएलबी 3', 'स्काय फोर्स' आणि 'सिंघम अगेन' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. अक्षय कुमारनं मुंबईतल्या घराबाहेर गरजूंना केलं अन्नदान, चाहत्यांनी केलं कौतुक - Akshay Kumar video
  2. "मी सर्वकाही स्वबळावर कमावतो", बॉक्स ऑफिसवरील अपयशाबद्दल अक्षय कुमार स्पष्टच बोलला - Akshay Kumar Box Office
  3. अक्षय कुमार आणि वाणी कपूर स्टारर 'खेल खेल में'मधील दुसरं गाणे रिलीज, पाहा व्हिडिओ - Khel Khel Mein Song

ABOUT THE AUTHOR

...view details