महाराष्ट्र

maharashtra

अक्षय कुमारनं मुंबईतल्या घराबाहेर गरजूंना केलं अन्नदान, चाहत्यांनी केलं कौतुक - Akshay Kumar video

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 2:19 PM IST

Akshay Kumar Langar : अक्षय कुमारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो गरजूंना अन्न वाटप करताना दिसत आहे. अक्षय कुमारचा सेवाभाव पाहून त्याचे चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Akshay Kumar Langar
अक्षय कुमार लंगर (अक्षय कुमार (IMAGE- ANI))

मुंबई - Akshay Kumar Langar:अक्षय कुमार आता 'खेल-खेल में' या कॉमेडी ड्रामा चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचे लागोपाठ अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत. दरम्यान अक्षय कुमार, फरदीन खान, आदित्य सील, एमी विर्क, वाणी कपूर, तापसी पन्नू आणि प्रज्ञा जैस्वाल 'खेल-खेल में'मध्ये त्यांच्या कॉमेडीनं धमाका करताना लवकरच दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मुदस्सर अजीज यांनी केलंय. नुकताच 'खेल-खेल में' चित्रपटाचा एक मजेशीर ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. हा ट्रेलर अनेकांना आवडला आहे. आता अक्षयला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. दरम्यान, अक्षय कुमारनं त्याच्या मुंबईतील घराबाहेर लंगर घडवून आणलं.

अक्षय कुमारचा व्हिडिओ झाला व्हायरल : चेहऱ्यावर मास्क घातलेला अक्षय कुमारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो गरजूंना अन्न वाटप करताना दिसत आहे. अक्षय कुमार जेव्हा एका महिलेला जेवण देतो, तेव्हा ती इतर लोकांनाही बोलावते. व्हायरल व्हिडिओत अक्षय कुमार निळ्या शर्ट आणि डेनिममध्ये दिसत आहे. तो आपल्या हातानं एका महिलेला जेवणाची थाळी देत आहे. अक्षय कुमारच्या या दयाळूपणाचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. एका चाहत्यानं व्हायरल व्हिडिओवर लिहिलं आहे की, "अक्षय सर एक डाउन टू अर्थ व्यक्ती आहे." दुसरा एकानं लिहिलं, 'सोन्याचं हृदय असलेला माणूस." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करत आहेत.

'खेल-खेल में' कधी प्रदर्शित होईल? :अक्षय कुमारचा 'खेल-खेल में' हा कॉमेडी ड्रामा रुपेरी पडद्यावर 15 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहेत. अक्षय या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा कॉमेडी झोनमध्ये पोहचला आहे. दरम्यान अक्षयच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तो 'धूम 4', 'हाऊसफुल 5', 'राऊडी राठौर 2', 'जॉली एलएलबी 3', 'स्काय फोर्स', 'कन्नप्पा', 'सिंघम अगेन', 'वेलकम टू द जंगल' आणि 'स्त्री 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. "मी सर्वकाही स्वबळावर कमावतो", बॉक्स ऑफिसवरील अपयशाबद्दल अक्षय कुमार स्पष्टच बोलला - Akshay Kumar Box Office
  2. अक्षय कुमार आणि वाणी कपूर स्टारर 'खेल खेल में'मधील दुसरं गाणे रिलीज, पाहा व्हिडिओ - Khel Khel Mein Song
  3. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाचा आफ्रिकेतील पारंपारिक डान्स व्हायरल - AKSHAY KUMAR T

ABOUT THE AUTHOR

...view details