मुंबई Ram mandir pran pritishtha ceremony :रामभक्तांची 500 वर्षांची प्रतीक्षा आज 22 जानेवारीला अखेर संपली. आज श्रीराम अयोध्येतील रामनगरीतील गर्भगृहात पोहोचले आहेत. जोरदार विरोधानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या अभिषेकाचा कार्यक्रम पूर्ण केला आहे. आता देशभरात रामाच्या नावाचा नारा दिला जात आहे. अयोध्येला पोहोचलेल्या राजकारण, व्यवसाय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बड्या व्यक्तींचे फोटो आणि व्हिडिओ एकामागून सोशल मीडियावर झळकताना दिसत आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी, सून श्लोका यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
श्रीराम मंदिरामधील फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल : श्रीराम मंदिरामधील एका फोटोत आकाश-श्लोकासोबत दिग्दर्शक रोहित शेट्टी, विकी कौशल, कतरिना कैफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि दिग्दर्शक सुभाष घई आहेत. याशिवाय या फोटोत राजकुमार हिराणी आणि आयुष्मान खुराना देखील दिसत आहेत. फोटोमध्ये सुभाष घई सेल्फी घेताना दिसत आहेत. या फोटोमध्ये प्रत्येकाचे चेहरे भक्तीभावाने भरलेले आहेत. या विशेष प्रसंगी या स्टार्सनं श्रीराम नावाचा जयघोष केला. दरम्यान श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होण्याआधी आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल आणि कतरिना कैफ एकाच ई-रिक्षातून राम मंदिरात पोहोचले होते.